SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देश पातळीवर आणणार : मंत्री शंभूराज देसाईलोकनेते देसाई अध्यासनाला निधीची कमतरता भासू देणार नाही : मंत्री शंभूराज देसाईमहाराष्ट्र सदन येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणसध्याच्या जागतिक परिस्थितीत कोरे अभियांत्रिकीचे प्लेसमेंट अभिमानास्पद : डॉ. विनय कोरेप्रशासनाच्या 'शब्दाला' हरताळ; कोल्हापुरात १५ जूनपासून शेतकरी उतरणार आमरण उपोषणालाअभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे ७ जून रोजी मोफत मार्गदर्शन कार्यक्रमडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'चे उद्घाटनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनजागतिक पर्यावरण दिन: निसर्गाशी नाते, उद्याची खात्री!कोल्हापूर हादरले: शिंगणापुरात नदीत बुडून ४ वर्षीय चिमुल्याचा दुर्दैवी मृत्यू

जाहिरात

 

सध्याच्या जागतिक परिस्थितीत कोरे अभियांत्रिकीचे प्लेसमेंट अभिमानास्पद : डॉ. विनय कोरे

schedule05 Jun 26 person by visibility 97 categoryशैक्षणिक

◼️कोरे अभियांत्रिकीत प्लेसमेंट डे २के २६ उत्साहात संपन्न

वारणानगर: सध्याची जागतिक युद्धजन्य परिस्थिती बघता ६०० हुन अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे बहुराष्ट्रीय कंपन्यात प्लेसमेंट होणं हे महाविद्यालयासाठी खूपच अभिमानास्पद आहे. आत्तापर्यंत वारणे मधून जगाच्या  कानाकोपऱ्यापर्यंत  अभियंते कार्यरत आहेत, म्हणजेच तात्यासाहेबांनी पाहिलेले नवा माणूस निर्माण करण्याचे स्वप्न वारणा परिसरात मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्ण झाल्याचे मत श्री वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी दिला. 

निमित्त होते तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड  टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालय आयोजित सन २०२५-२६ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवानिमित्त आयोजित केलेल्या प्लेसमेंट डे चे.त्यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व वारणेचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले असतील असे सांगितले. याप्रसंगी डॉ . विनय कोरे यांनी प्रत्येक निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. 

वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच.  पाटील सर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

वारणा विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले की, नवीन कौशल्य शिका, शिकलेली कौशल्य नव्याने आत्मसात करा, हीच कौशल्ये तुम्हाला यशाचा राजमार्ग दाखवतील. 

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील यांनी त्यांच्या प्रास्ताविक आणि स्वागतामध्ये यावर्षी आत्तापर्यंत ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाल्याचे सांगितले. तसेच अनेक कंपन्यांचे निकाल प्रलंबित असल्याचे सांगितले. सरासरी पाच लाख रुपयांचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले. तसेच ते पुढे म्हणाले की या वर्षी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट सुद्धा मिळाले. 

अभियांत्रिकी महाविद्यालया बरोबर शिक्षण मंडळातील तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक आणि आयटीआय यांचेही 100% प्लेसमेंट झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर  अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे यावर्षी 100% प्लेसमेंट झाल्याचे सांगितले. 

याप्रसंगी निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांनी, सलोनी पाटील, श्रध्दा सावलगी, तन्वी पाटील, पूजा जावळे, तन्वी पाटील- केमिकल, पूजा साळोखे- पदवीका,यांनी तात्यासाहेब कोरे यांनी सुरू केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या, डॉ. विनय कोरे यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली म्हणून व सध्याच्या व्यवस्थापन, प्राध्यापक व कर्मचारी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

 यावेळी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, प्रभारी प्राचार्य, डॉ. के. आय. पाटील, डॉ. एस. एम. पिसे, अधिष्ठाता,  पॉलिटेक्निकचे प्राचार्य, डॉ . पी.आर..पाटील, प्रा. आर. सी. शिक्केरी उपस्थित होते. 

सकाळच्या सत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे प्रशस्तीपत्र व टी-शर्ट देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयकांनी अथक परिश्रम घेतले यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक , स्टाफ इतर कर्मचारी व निवड झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐश्वर्या गुरव, वैष्णवी पाचपुले, मनस्वी मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes