SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनजागतिक पर्यावरण दिन: निसर्गाशी नाते, उद्याची खात्री!कोल्हापूर हादरले: शिंगणापुरात नदीत बुडून ४ वर्षीय चिमुल्याचा दुर्दैवी मृत्यूफ्लिपकार्टमध्ये डीकेटीईच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवडशाहू विचारांचे भाष्यकार ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोपरांत) ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार' जाहीरड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार:पालकमंत्री हसन मुश्रीफकोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरूखेत बचाव अभियान अंतर्गत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षणखरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देशकोल्हापुरात मोफत 'वॉटर रेस्क्यू' प्रशिक्षण: दिनकर कांबळे यांचा पुढाकार

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकन

schedule05 Jun 26 person by visibility 143 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळाचे (एनबीए) टीएर-१ (वॉशिंग्टन ॲकॉर्ड) हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाल्याची माहिती डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.

हॉटेल सयाजी येथे आयोजित विशेष समारंभात डॉ. पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र-कुलपती व संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त  पूजा ऋतूराज पाटील, कार्यकारी संचालक व डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, एन बी. ए. समन्वयक डॉ. गणेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

केमिकल इंजिनिअरिंग,  सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि मॅकेनिकल इंजिनिअरिंग या पाच अभ्यासक्रमांना हे मानांकन मिळाले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, परिणामाधारित शिक्षण, संशोधन, उद्योग-संलग्नता, प्रयोगशाळा सुविधा आणि विद्यार्थ्यांची प्रगती यांचे सखोल मूल्यमापन केल्यानंतर हे मानांकन प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉ. पाटील म्हणाले, हे मानांकन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मिळालेली जागतिक दर्जाची गुणवत्ता-पावती आहे. भविष्यातही जागतिक दर्जाचे अभियंते घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील. संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे हे यश आहे. 

ऋतुराज पाटील म्हणाले,  या मानांकनामुळे विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. उद्योग, संशोधन आणि नवोपक्रम यांचा संगम घडवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयत्नशील आहे. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, आजी- माजी विद्यार्थी आणि व्यवस्थापनाच्या संयुक्त प्रयत्नांचे हे यश आहे. 

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, भारत वॉशिंग्टन अकॉर्डचा सदस्य असल्याने या अभ्यासक्रमांना २6 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षण, जागतिक रोजगार संधी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी मोठा लाभ होणार आहे. या मानांकनामुळे महाराष्ट्रातील नाही तर पश्चिम भारतातील मोजक्या महाविद्यालयामध्ये आपल्या कॉलेजचा समावेश झाला आहे. 

प्राचार्य डॉ. संतोष चेडे म्हणाले, हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि परिणामाधारित शिक्षण व्यवस्थेवरील राष्ट्रीय विश्वासाचे प्रतीक आहे.

यावेळी डॉ. गणेश पाटील, सिव्हील विभागप्रमुख किरण माने, केमिकल विभागप्रमुख डॉ. के. टी.  जाधव, कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल, इलेक्ट्रोनिक्स अड टेलीकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. टी. बी. मोहिते पाटील, पोलीटेक्निक्चे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त केले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शिंदे व प्रा. मधुगंधा मिठारी यांनी केले तर आभार डॉ. एल. व्ही.  मालदे यांनी मानले. यावेळी शिवाजी.   विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ ए. एन जाधव, डी. वाय. पाटील गृपच्या सी.एच. आर. ओ. श्रीलेखा साटम यांच्यासह ग्रुपच्या विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

🟠 मानांकनाचे प्रमुख फायदे 
* अभियांत्रिकी पदवीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
* परदेशातील उच्च शिक्षण व रोजगारासाठी वाढीव संधी
* जागतिक दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री
* आंतरराष्ट्रीय व्यावसायिक गतिशीलतेस चालना
* उद्योगाभिमुख व परिणामाधारित शिक्षणाला बळ
* विद्यार्थ्यांच्या जागतिक स्पर्धात्मकतेत वाढ

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes