SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​भिमा हेल्थ झोनच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे १० कोटींचा प्रस्ताव; कृष्णराज महाडिकांच्या प्रयत्नांना वेग.जयसिंगपुरात राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरणगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 'हीच खरी शिवसेना', कोल्हापुरातील सभेतून अमित शाहांचे मोठे विधानडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट१४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ'हा देश म्हणजे धर्मशाला नाही!' कोल्हापूरच्या भूमीतून अमित शाह यांचा विरोधकांवर एल्गारजागतिक शरणार्थी दिन: माणुसकीच्या नात्याने संघर्षाला सलामकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन व स्वागतविधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!

जाहिरात

 

​भिमा हेल्थ झोनच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे १० कोटींचा प्रस्ताव; कृष्णराज महाडिकांच्या प्रयत्नांना वेग.

schedule20 Jun 26 person by visibility 179 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापुरातील खेळाडूंना कुस्ती, फुटबॉलनंतर ऍथलेटिक्स गेमच्या विकासासाठी झगडावे लागत आहे. या खेळाडूंना ऍथलेटिक्ससाठी एकाच छताखाली विविध खेळांच्या मैदानाची उपलब्धता करून देण्याच्या उद्देशाने भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी १० कोटी रूपये निधीच्या मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. आज कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १० कोटी निधीच्या मागणीचा प्रस्ताव कृष्णराज महाडिक यांच्याकडून देण्यात आला. लवकरच यावर बैठक घेवून, निर्णय घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

कोल्हापुरातील ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारासाठी खेळाडूंना पाठबळाची गरज आहे. एकाच ठिकाणी जलतरण, फुटबॉल, हेल्थ झोन यासह विविध मैदानांचा आणि खेळांचा विकास साधण्यासाठी निधीची गरज आहे. कोल्हापुरातील टाकाळा परिसरात भिमा हेल्थ झोन या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा एकमेव जलतरण तलाव आहे. या तलावाचा विकास, त्याच्या बाजुला असलेल्या फुटबॉल मैदानाचा विकास आणि याच कॅम्पसमध्ये असलेल्या व्यायाम शाळेचा विकास, यासह अन्य खेळांच्या विकासासाठी निधीची तरतुद करता येवू शकते. याबाबत आज भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी, कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून १० कोटी रूपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव दिला. 

यावर मुंबईत बैठक घेवून, कोल्हापूरच्या ऍथलेटिक्स विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लवकरच भिमा हेल्थ झोन मध्ये ऍथलेटिक्सच्या विकासासाठी निधीची उपलब्धता होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes