SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबडोदा बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या कबनूरकर भावंडांचे यशआद्य शंकराचार्य जयंती उत्सव रविवारपासून; आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजनकोथळीतील अपघातग्रस्त कुटुंबाला जिल्हा बँकेकडून दोन लाखांचा विम्याचा धनादेश प्रदानभुंगे पकडा, हुमणी रोखा!, उद्यापासून जिल्ह्यात किड नियंत्रण स्पर्धाज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभपंचगंगा–कृष्णा संगमावर ‘गोदा ते नर्मदा’ जलदिंडीसाठी पवित्र जलकलश पूजन; आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्नशेतीसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज : बसवराज मास्तोळीजागतिक हिवताप दिन: 'मलेरियामुक्त' भविष्यासाठी कटिबद्ध होऊया!

जाहिरात

 

कुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule25 Apr 26 person by visibility 73 categoryराज्य

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

नाशिक :  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महंत हरीगिरीजी महाराज (जुना आखाडा), महंत रविंद्रपुरीजी महाराज (निरंजनी आखाडा), महंत शंकरानंद (आनंद आखाडा), महंत गिरीजानंद, महंत रामकृष्ण लहवितकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार हिरामण खोसकर, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह मंदिर देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्याधिकारी योगेश जाधव, कैलास घुले, मनोज थेटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामे करण्यात येत आहेत. या कामांना अधिक गती देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वर येथील विकास कामाच्या अनुषंगाने येथील सर्व आखाड्यांच्या महंतांशी लवकरच चर्चा करणार असून त्यासाठी एक बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes