SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबडोदा बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या कबनूरकर भावंडांचे यशआद्य शंकराचार्य जयंती उत्सव रविवारपासून; आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजनकोथळीतील अपघातग्रस्त कुटुंबाला जिल्हा बँकेकडून दोन लाखांचा विम्याचा धनादेश प्रदानभुंगे पकडा, हुमणी रोखा!, उद्यापासून जिल्ह्यात किड नियंत्रण स्पर्धाज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभपंचगंगा–कृष्णा संगमावर ‘गोदा ते नर्मदा’ जलदिंडीसाठी पवित्र जलकलश पूजन; आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्नशेतीसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज : बसवराज मास्तोळीजागतिक हिवताप दिन: 'मलेरियामुक्त' भविष्यासाठी कटिबद्ध होऊया!

जाहिरात

 

आद्य शंकराचार्य जयंती उत्सव रविवारपासून; आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

schedule25 Apr 26 person by visibility 99 categoryसामाजिक

कोल्हापूर : श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव येथील पीठामध्ये २६ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत आयोजित केला आहे. त्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या, २६ एप्रिलला सकाळी ७ वाजता ऋग्वेद संहितेचा देवतांना अभिषेक, आठ वाजता दशोपनिषद वाचन, गीताभाष्य आणि ब्रह्मसूत्रभाष्य पारायण या दैनंदिन कार्यक्रमांनी उत्सवाची सुरवात होईल. त्यानंतर जन्मकाळ, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले आहे. याचवेळी दररोज होमहवन व सायंकाळी गायनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

३० एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पुरस्कार वितरण होईल. यामध्ये वैदिक पुरस्कार वे.शा.सं. मंदार महेश पुजारी (नृसिंहवाडी), सांस्कृतिक पुरस्कार वे.शा.सं. डॉ. सीताराम नारायण जोशी (परभणी), कीर्तनकार पुरस्कार हभप रामचंद्रबुवा प्रभाकर भिडे (पुणे), स्थानिक वैदिक पुरस्कार वे.शा.सं योगेश मुरलीधर खरे (कोल्हापूर), सामाजिक गौरव डॉ. हेमंत विंझे (मुंबई), महिला कीर्तनकार हभप सौ. वर्षा वसंत बेडेकर (नागपूर), होतकरू विद्यार्थी वेदांत कुमार जोशी (नांदेड), चिन्मय बाळकृष्ण कुलकर्णी (जालना), उत्कृष्ट शासकीय कर्मचारी विजय जोशी (पुणे), विशेष गौरव पंडित पराग चौधरी (संभाजीनगर) यांना शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. 

१ मे रोजी महाप्रसाद व पालखी प्रदक्षिणाने उत्सवाची सांगता होईल. यावेळी पीठामध्ये दुपारी ४ वाजता पालखीचे पूजन होऊन शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी लवाजमासह करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास जाईल. तेथून पुन्हा पीठात येईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes