धक्कादायक : स्वतःवर गोळी झाडून लातूर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
schedule06 Apr 25 person by visibility 218 categoryगुन्हे

मुंबई : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लातूर येथील शासकीय निवासस्थानातही घटना शनिवारी रात्री घडली. मनोहरे यांनी स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. ही घटना लातूरसह संपूर्ण राज्यात खळबळ माजवणारी ठरली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आयुक्तांची रिव्हॉल्वर ताब्यात घेतली आहे. मात्र, आतापर्यंत मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
ही घटना लातूर शहरात चर्चेचा विषय बनली असून, मनोहरे यांनी कौटुंबिक कारणामुळे की त्यांच्यावर कार्यालयीन तणावात हा निर्णय घेतला, याबाबत लातूरमध्ये चर्चा सुरू आहे.
बाबासाहेब मनोहरे हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, हे अजूनही गूढच आहे. सध्या सर्वांचे लक्ष मनोहरे यांच्या प्रकृतीकडे आणि या घटनेच्या तपासाकडे लागले आहे.