केबल चोरीचे 2, मोटारसायकल चोरीचे 2 असे 4 गुन्हे उघडकीस; 3,00,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
schedule05 Apr 25 person by visibility 324 categoryगुन्हे

कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केबल आणि मोटारसायकल चोरटा विजय मधुकर गुरव (वय 32.रा.शिरगांव, ता. शाहुवाडी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन 3 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून केबल चोरीचे 2 आणि मोटारसायकल चोरीचे 2 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात घडलेले शेतातील केबल चोरीचे गुन्हयासह मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेचे दृष्टीने गुन्हे घडलेची ठिकाणे, वेळ व पध्दत यांचा अभ्यास करुन तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, सोमराज पाटील व वसंत पिंगळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कोडोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा हा विजय गुरव, रा.शिरगांव, ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर याने व त्याचे साथीदाराने मिळुन केला असून तो आज रोजी टाटा कंपनीची नॅनो गाडी क्र. एमएच-02-बीटी-0870 मधुन चोरलेली गेलेली केबल घेवून काखे फाटा, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे येणार आहे. मिळाले माहितीवरून वरील तपास पथकाने दि. 04.04.2025 रोजी काखे फाटा कोडोली येथे जावून सापळा लावून आरोपी नामे विजय मधुकर गुरव, व.व.32, रा. शिरगांव, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर व एक अल्पवयीन बालक यांना नॅनो गाडी व एक मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्यांचे कब्जातील नॅनो गाडीमध्ये गोणपाटामध्ये गुंडाळलेली सुमारे 800 फुट लांबीची काळ्या रंगाची पॉलीकेप असा एकूण 3,00,000/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. नमुद इसमांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जात मिळून आले मुद्देमालाबाबत सखोल तपास केला असता त्यांनी 02 केबल चोरी व 02 मोटर सायकल चोरी असे एकूण चार गुन्हे केलेची कबुली दिली. आरोपी विजय गुरव यास जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी कोडोली पोलीस ठाणे येथे जमा केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मा.अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील व अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, वसंत पिंगळे, सोमराज पाटील, विनोद कांबळे, संजय पडवळ, अरविंद पाटील, राम कोळी, रोहीत मर्दाने व हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे.