SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार याच आमच्या नेत्या : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणगोकुळ'मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी अध्यादेश आणल्यास तो बेकायदेशीर माजी सरन्यायाधीशांनी दिला होता कायदेशीर सल्लागोकुळच्या शासन नियुक्त संचालकांविरोधात महायुतीच्या कार्यकर्त्यांचेच बंड; बानगेत महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन!गोकुळ दूध संघाचा ‘डेडलॉक’ दूर करण्यासाठीच सरकारची कारवाई: मंत्री हसन मुश्रीफ‘गोकुळ’ मध्येू वसुबारस निमित्त- म्हैस व गाय-वासराचे पूजन गोकुळसाठी कोल्हापूरकरांचा एल्गार! ९ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघातगोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार: आमदार सतेज पाटीलमराठी रंगभूमी दिन: परंपरेचा आणि समृद्धतेचा सुवर्णसोहळादुष्काळाचा फटका बसलेल्या सहकारी संस्थांना मोठा दिलासा; निवडणुका लांबल्या तरी बसणार नाही प्रशासकाचा ससेमिरा!झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची झोपडपट्टीधारकांना ग्वाही

जाहिरात

 

गोकुळ'मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी अध्यादेश आणल्यास तो बेकायदेशीर माजी सरन्यायाधीशांनी दिला होता कायदेशीर सल्ला

schedule05 Nov 26 person by visibility 186 categoryराज्य

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश आणून तज्ज्ञ व शासकीय स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही, असा  कायदेशीर सल्ला भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी दिला आहे. असा अध्यादेश म्हणजे मनमानी कारभार  आणि अधिकारांचा गैरवापर  ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. 

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील वकील अ‍ॅड. श्रीकृष्ण गणबावले यांनी गोकुळच्या १३ बहुमतातील निर्वाचित संचालकांच्या वतीने माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्याकडून कायदेशीर सल्ला मागवला होता. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी त्यावर अभिप्राय दिला आहे.

 कलम ७३ अअअ आणि २७(९) नुसार स्वीकृत व शासकीय नामनिर्देशित संचालकांना अध्यक्ष किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही. बहुमताचा कौल नाकारण्यासाठी अध्यादेशाद्वारे हा अधिकार देणे हे राजकीय हेतूने प्रेरित असून लोकशाही मूल्यांच्या विरोधी आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने (रिट याचिका ५७६२/२०२६) २ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात १० नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीसाठी स्पष्टपणे २५ निर्वाचित संचालकांना ७ दिवसांची नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाचा हा आदेश प्रलंबित असताना असा अध्यादेश काढणे म्हणजे थेट न्यायदानाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणे ठरेल, असेही गवई यांनी अभिप्रायमध्ये म्हंटले आहे.

राज्य सरकारचा असा कोणताही अध्यादेश उच्च न्यायालयात आव्हान दिल्यास रद्द ठरण्यास पात्र राहील,असेही या अभिप्रायमध्ये म्हंटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes