SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आमदार सतेज पाटील यांचा आज वाढदिवस; विविध उपक्रमाचे आयोजनअंतराळ संशोधनातील ऐतिहासिक भरारी: जागतिक मानव अंतराळ उड्डाण दिनक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन सीपीआर मध्ये यशस्वी व्हेरिकोज वेन्स शस्त्रक्रिया; रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” : प्राचार्य डॉ. जी. पी. माळीकोल्हापुरात १४ एप्रिल रोजी दसरा चौक मैदानावर प्रबोधन महासभेचे आयोजन मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे : आ. सुहास बाबरराधानगरीत रानगव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यूआर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदेघोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश

जाहिरात

 

आमदार सतेज पाटील यांचा आज वाढदिवस; विविध उपक्रमाचे आयोजन

schedule12 Apr 26 person by visibility 181 categoryसामाजिक

कोल्हापूर  : काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा आज रविवारी 54 होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात केला जाणार आहे.  'देऊया गरजूना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात' हे ब्रीद घेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी या वाढदिवसाला विधायक रूप देत दातृत्वाचा जागर करणार आहेत.
   
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच सतेज पाटील यांचा वाढदिवस होत असल्याने कॉग्रेस पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप पासून फुटबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, बैलगाडी शर्यत, फळे वाटप, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरासह अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार सतेज पाटील हे आज दुपारी 3 नंतर कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ आणू नयेत त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन सहयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes