खासदार धनंजय महाडिक, भाजपच्या वतीने मराठवाड्यातील दीड हजार पुरग्रस्त कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट
schedule29 Sep 25 person by visibility 278 categoryसामाजिक

▪️मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता ट्रक रवाना होणार
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या वतीने मराठवाड्यातील पुरग्रस्त भागाला जीवनावश्यक वस्तूंचे कीट पाठवले जाणार आहे. त्यासाठी हेरले इथं जावून, खासदार महाडिक यांनी कीट बनवण्याच्या कामाची आज पाहणी केली. मराठवाड्यातील पुरग्रस्त दीड हजार कुटूंबांकडे मंगळवारी ही कीट रवाना केली जातील. सोलापूरसह मराठवाड्यातील पुरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी, महाडिक परिवार कटिबध्द असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडयात अतिवृष्टी झाली असून, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा वेळी खासदार धनंजय महाडिक आणि कोल्हापूर भाजपच्या वतीने, मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाला जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये तांदूळ, गहू पीठ, साखर, चहा पावडर, तेल, मीठ, चटणी, कांदा- बटाटा, तूरडाळ -मसूरडाळ, टूथपेस्ट, ब्रश, चहा पावडर, ब्लँकेट -चादर, टॉवेल, अंगाचा साबण, कपड्याचा साबण अशा पदार्थांचा समावेश आहे.
हे कीट तयार करण्याचे काम हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या श्री बिस्कीटच्या गोदामात सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी या ठिकाणी जावून भेट देवून, कीट मधील प्रत्येक पदार्थाचा दर्जा तपासला. सुमारे १५०० पुरग्रस्तांना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता हे कीट पाठवले जाईल. खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयापासून मंगळवारी सकाळी मदतीचे ट्रक मराठवाड्याकडे रवाना होतील. दरम्यान भाजपाचे हेरले मधील पदाधिकारी, ग्रामपंचायत आणि श्री बिस्कीट यांच्या वतीने खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी इंद्रजित जाधव, सचिन तेरदाळे, मकरंद बोराडे, राहुल कुंभार, पद्मश्री तेरदाळे, बिपिन अलमान, प्रशांत माळी, अविनाश पाटील, स्वप्निल चौगुले, सुनील खारेपाटणे, प्रमोद महाडिक, विनोद कुरणे, अभिषेक मोहिते, डॉ सतीश तेरदाळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मदत कीट रवाना होण्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे.