SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा उत्साहात निरोप समारंभकल्पनेपासून कृतीपर्यंत : केआयटीमध्ये उद्योजकतेचा प्रेरणादायी जागरजागतिक थायरॉईड दिन: आरोग्य आणि जागरूकतेचा संदेशशिवाजी विद्यापीठात उद्यापासून जागतिक पर्यावरण अभियानराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदानउत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणे उपलब्ध; गरीब रुग्णांना मोठा दिलासा'स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारवड'चालुक्याज् क्रीडा महोत्सव २०२६: जिमनास्टिक्स व बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; पुणे आणि साताऱ्याची बाजीकागलमध्ये राजमाता जिजाऊ बसचे स्वागत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बसचे पूजन

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी तातडीने द्या; खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्र्यांकडे आक्रमक मागणी

schedule02 Apr 26 person by visibility 400 categoryदेश

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी  नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नुकतीच भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विविध योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र त्यापैकी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी, प्रत्यक्ष विद्यापीठाकडे वर्ग झालेला नाही. विद्यापीठातील नाविन्यपूर्ण योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीपैकी सुमारे ५७ लाख १४ हजार रुपयांचा निधी येणे बाकी आहे. वैयक्तिक संशोधन प्रकल्पांसाठी सुमारे १३ लाख १२ हजार रुपयांचा निधी येणे गरजेचे आहे. विद्यापीठातील हिंदी विभागाच्या विविध कामांसाठी २५ लाख ३२ हजार रुपये येणे आवश्यक आहे. 

तर विद्यापीठातील विविध विभागांच्या अध्यासनांसाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी येणे आवश्यक आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठाच्या अकराव्या योजनेतील सुमारे ६ कोटी ४२ लाख रुपये येणे बाकी आहे. तर बाराव्या योजनेअंतर्गत विद्यापीठाला ९ कोटी ५७ लाख रुपये येणे गरजेचे आहे. 

याशिवाय अन्य काही योजनांसाठी मंजूर झालेल्या निधीतील काही रक्कम विद्यापीठाकडे आली असली, तरी बरिचशी रक्कम येणे बाकी आहे. याबाबत शिवाजी विद्यापीठाने विनंती केल्यानुसार, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. शिवाजी विद्यापीठाला मंजूर झालेल्या निधीतील थकीत सुमारे ५० कोटी रुपये तातडीने मिळावेत, या मागणीचे निवेदन, नामदार धर्मेंद्र प्रधान यांना देण्यात आले. खासदार महाडिक यांच्या मागणीबद्दल, केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes