महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे निधन
schedule16 Mar 25 person by visibility 275 categoryदेश

राजस्थान : उदयपूरच्या माजी राजघराण्यातील सदस्य अरविंद सिंग मेवाड (८०) यांचे निधन झाले आहे. ते बऱ्याच दिवसापासून आजारी होते. आणि सिटी पॅलेसमधील शंभू निवास येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अरविंद सिंह मेवाड हे महाराणा प्रताप यांचे वंशज होते. त्यांचे वडील भागवत सिंह मेवाड आणि आई सुशीला कुमारी मेवाड होते. त्यांचा मोठा भाऊ महेंद्र सिंग मेवार यांचे गेल्या वर्षी १० नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले.
अरविंद सिंह मेवाड यांच्या निधनानंतर, सिटी पॅलेस पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. सिटी पॅलेसच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
अरविंद सिंह मेवार यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ७ वाजता सिटी पॅलेस येथे अंत्यसंस्कार केले जातील. त्यांची अंतिम यात्रा सकाळी ११ वाजता शंभू पॅलेस येथून सुरू होईल आणि बडी पोल, जगदीश चौक, घंटाघर, बडा बाजार, दिल्ली गेट मार्गे महासतिया येथे पोहोचेल, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.