SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यंदा सांगलीत रंगणार महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा!!महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 36 नागरिकांचे अर्ज दाखल; प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे; ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ला निकालसंजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांच्या पेन्शनमध्ये वाढ करा; शिष्टमंडळाची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सीलवर्गीस कुरियन: भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार आणि अमूलचे जनककोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरीनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

जाहिरात

 

यंदा सांगलीत रंगणार महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा!!

schedule09 Sep 26 person by visibility 123 categoryक्रीडा

◼️महाराष्ट्र राज्य 15 वर्षाखालील खुली व मुलींच्या स्वतंत्र निवड फिडे रेटिंग अजिंक्यपद  बुध्दिबळ स्पर्धा 2026 यंदा सांगली मध्ये!!

  कोल्हापूर  :  जी एच रायसोनी नागपूर, कल्पना फौंडेशन नागपूर पुरस्कृत, सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन, आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्यावतीने आयोजित h2e पॉवर सिस्टिम प्रस्तुत 15 वर्षाखालील खुली आणि मुलींच्या स्वतंत्र फिडे रेटिंग निवड बुध्दिबळ स्पर्धा दि.11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत रेशीमगाठी सांस्कृतिक हॉल, स्फूर्ती चौक सांगली इथे पार पडणार आहे.

स्पर्धा उदघाट्न शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना सचिव निरंजन गोडबोले यांच्या  हस्ते, तसेच सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष, आणि चितळे उद्योग समूहाचे प्रमुख  गिरीश चितळे, सचिव चंद्रकांत वळवडे आणि सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेले खेळाडू तसेच  इतर दि.1.1.2011 नंतर  जन्मलेले 15 वर्षाखालील संपूर्ण राज्यातून मुले व मुली सहभागी होऊ शकतात. तब्बल 200 पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत खेळतील असा विश्वास आहे.

जिल्हा निवड खेळाडूंची स्पर्धेची फी रू. ₹1000/- आहे. तर डोनर एन्ट्री फी ₹2000/- आहे.

सदर स्पर्धेतील 4 मुले व 4 मुली यांची

तेलंगणा इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. सदर खेळाडू महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय स्पर्धेत नेतृत्व करतील.

जागतिक बुद्धिबळ संघटना प्राप्त क्लासिकल रेटिंग मिळवण्यासाठी अतिशय योग्य आणि सुवर्ण संधी 15 वर्षाखालील खेळाडूंना मिळणार आहे.

सदर स्पर्धा हि जागतिक बुद्धिबळ संघटना म्हणजे फिडेच्या स्विस सिस्टिम प्रमाणे होणार आहे. तब्बल 8 फेऱ्यामंध्ये होणाऱ्या या जागतिक दर्जाच्या मानांकन स्पर्धेत 60 मिनिट आणि 30 सेकंड बोनस या वेळ प्रणाली नुसार राऊंड होणार आहेत. शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी 3 राऊंड, शनिवार 12 सप्टेंबर रोजी 3 राऊंड आणि रविवार 13 सप्टेंबर रोजी 2 राऊंड होतील. रविवार सायंकाळी 4:30 वा बक्षीस वितरण कार्यक्रम होईल.

 सदर स्पर्धेत तब्बल ₹48,000/- रुपयांची रोख पारितोषिके तसेच स्वतंत्र खुला गट आणी मुली यांच्यासाठी पारितोषिके आणि ट्राँफी दिली जाणार असून , या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना  जागतिक बुद्धिबळ संघटना फिडे चे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी- रत्नागिरी, आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर - सांगली, राष्ट्रीय पंच करण परीट, इचलकरंजी, विजयकुमार माने, सांगली, यश लोहाना - कराड, रोहित पोळ - इचलकरंजी, राज्य पंच नाझिया पटेल - मिरज, अनिता भोसले जांभळी हे काम पाहणार आहेत.

सांगली मध्ये होणाऱ्या फिडे मानांकन निवड बुद्धिबळ स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवावे तसेच राज्य पातळीवर स्पर्धा खेळून राष्ट्रीय स्पर्धेत निवड होण्याची संधी मिळवावी असे आवाहन स्पर्धा संयोजक गिरीश चितळे आणि संघटना सचिव श्री चंद्रकांत वळवडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी, 

सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना सचिव चंद्रकांत वळवडे. 9975959055 यांचेशी संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes