कोल्हापूरकरांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी महायुती : रवींद्र चव्हाण; कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ
schedule04 Jan 26 person by visibility 224 categoryराजकीय
कोल्हापूर : विरोधक हे भावनिक आवाहन करत आहेत. त्यांच्या खोटेपणाला बळी पडू नका. विरोधकांकडे सत्ताही नाही आणि व्हिजनही नाही. कोल्हापूरकरांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी ही महायुती झाली आहे. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले .
भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) च्या महायुतीच्या महापालिका प्रचार प्रारंभावेळी मिरजकर तिकटीला झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. चव्हाण यांच्या हस्ते प्रचारगीताचे प्रकाशन करण्यात आले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विरोधकावर हल्लाबोल केला ते म्हणाले कधी आघाडी म्हणून, कधी पक्ष म्हणून इतकी वर्षे सत्ता होती आणि महापालिका निवडणूक आल्यानंतर तुम्ही विकासाबद्दल बोलत आहात. इतकी वर्षे झोपा काढत होता काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पाटील म्हणाले, पाच लाखांच्या या छोट्या शहरामध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. जे रस्ते केले त्यातही ढपला पडला. गेल्यावेळीच महायुतीची सत्ता आली असती.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, केवळ उणीदुणी काढण्यापेक्षा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही नागरिकांसमोर जात आहोत.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, मंजूर करून आणलेला बास्केट ब्रीजआघाडीच्या काळात रद्द करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या १५ वर्षांतील सत्तेचा पंचनामा होण्याची गरज आहे. थेट पाइपलाइन, टोल आणायचे पाप त्यांनी केले आहे. यावेळी आदिल फरास यांचेही भाषण झाले. भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत केले. हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आमदार अमल महाडिक, भाजप प्रदेश सचिव राजेश पांडे, सत्यजित कदम, सुनील कदम, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, प्रा. जयंत पाटील, कृष्णराज महाडिक उपस्थित होते.

