SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणुकीत महायुतीच सरशी ठरणार; खासदार धनंजय महाडिकांचा दावाकोल्हापूर शहरातील ५३ रिक्षांवर कारवाई; २३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूलआंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन: सागरी महाकाय जीवांच्या संरक्षणाचा संकल्पआदिवासींनी केलेल्या बांबूच्या राख्यांना शिवाजी विद्यापीठात प्रतिसादगगनबावड्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि वसतिगृहामधील मुलींच्या हस्ते राखी बांधून कृष्णराज महाडिक यांनी केला अनोखा रक्षाबंधन सोहळामुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्रउंचगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप५ सप्टेंबरला रंगणार युवाशक्ती दहीहंडीचा थरार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३ लाख रूपयांचे बक्षीसकागल तालुक्यातील सहा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात वॉकेथॉन

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीत महायुतीच सरशी ठरणार; खासदार धनंजय महाडिकांचा दावा

schedule30 Aug 26 person by visibility 195 categoryराजकीय

कोल्हापूर : आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीचाच मोठा वरचष्मा राहील आणि गोकुळची ही निवडणूक महायुती म्हणून लढवून २५ विरुद्ध शून्य असाच विजय मिळवला जाईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य केले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जसा १० पैकी १० आमदार महायुतीचे आले आणि १०-० असा स्कोअर राहिला, अगदी तसाच गोकुळमध्येही २५ च्या २५ जागा महायुतीच्याच येतील आणि महाविकास आघाडीचा स्कोअर शून्य राहील, असा दावा खासदार महाडिक यांनी केला. निवडणुकीचे राजकारण तापले असून अनेक तक्रारी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्या, तरी गोकुळमधील सभेचे सभासद आणि ठरावधारक मोठ्या संख्येने महायुतीच्या पाठीशी आहेत.

सध्या काही विरोधक सोबत येण्याच्या गोष्टी करत असले तरी, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. परंतु, गोकुळ निवडणुकीत एकदम असे बदल होणे कठीण आहे. पाच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि सत्तेची सूत्रे असतानाही विरोधकांनी दमदाटी करून कसेतरी पॅनेल बनवले होते आणि अतिशय कमी मतांनी पराभव केला होता. आता तीच महाविकास आघाडी समविचारी आघाडी म्हणून विरोधात उभी ठाकणार असली, तरी महायुती एकजुटीने ही निवडणूक लढवून बाजी मारेल.
गोकुळ निवडणुकीतील विविध घडामोडींवर आणि जागावाटपावर महायुतीचे नेते लवकरच योग्य तो निर्णय घेतील आणि एक, दोन दिवसांत निवडणुकीच्या अधिकृत भूमिका स्पष्ट केल्या जातील, असेही खासदार महाडिक यांनी शेवटी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes