SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरास काळम्मावाडीतून दोन दिवस पाणी पुरवठा बंदआंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिन: पर्वतांच्या भूताचे अस्तित्व आणि संवर्धनाचा लढाजलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंहकोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक औषध भांडारात औषधांचा साठा नियमानुसार उपलब्‍ध असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा सुरळीत सुरुकनवाड व कुटवाड येथील आरोग्य शिबिरात ५७७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर : विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील ७ आस्थापने सीलहॉटेल्स, हॉस्पिटल्स व व्यापारी संकुलांच्या बांधकामांची कोल्हापूर महापालिकेकडून होणार तपासणीटीकेआयईटीमध्ये 'वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब'चे दिमाखदार उद्घाटनफुलेवाडीत ३० ऑक्टोबरपासून भव्य ‘फुलेवाडी महोत्सव’; विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजनगोकुळच्या नूतन संचालक मंडळाचा पाटील कुटुंबीयांच्या वतीने सत्कार

जाहिरात

 

कोल्हापूर शहरास काळम्मावाडीतून दोन दिवस पाणी पुरवठा बंद

schedule23 Oct 26 person by visibility 202 categoryमहानगरपालिका

◼️काळम्मावाडी योजनेच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील एक्स्प्रेस फिडर लाईनवर आयसोलेटर बसविण्याचे काम 
◼️महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत सोमवारी व मंगळवारी काम
◼️पाणीपुरवठा विभागाचे शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन

कोल्हापूर : काळम्मावाडी योजनेच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील एक्स्प्रेस फिडर लाईनवर आयसोलेटर बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत सोमवार व मंगळवार, दि. २६ व २७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या कामामुळे काळम्मावाडी योजनेचा विद्युतपुरवठा दोन दिवस बंद राहणार असून, या योजनेतून शहराला पाणीपुरवठा करता येणार नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरातील नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

 या कालावधीत नागरिकांची पाण्याची गैरसोय कमी करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. मात्र, उपलब्ध पर्यायी व्यवस्थेमुळे शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. सोमवार व मंगळवार, दि. २६ व २७ ऑक्टोबर रोजी नियमित दैनंदिन पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजीही पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

               यावेळी ए व बी वॉर्ड : पुईखडी, कलिकतेनगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटीलनगर, जिवबानाना, बापूरामनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्यायणी कॉम्प्लेक्स, तपोवन, देवकर पाणंद, मोरे-मानेनगर, संभाजीनगर स्टँड, नाळे कॉलनी, रामानंदनगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, आर. के. नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, गंजीमाळ, संपूर्ण शिवाजी पेठ, राज कपूर पुतळा परिसर, संपूर्ण मंगळवार पेठ, पोतनीस बोळ, मंगेशकरनगर, बेलबाग, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, त्रिकोणी गॅरेज, नेहरूनगर, वाय. पी. पोवारनगर, जवाहरनगर व संलग्न ग्रामीण भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

               तसेच ई वॉर्ड : संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल परिसर, शाहू मिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल परिसर, सम्राटनगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदिर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृती नगर, पायमल वसाहत, अंबाई डिफेन्स, राजाराम रायफल, काटकरमाळ, बावडा फिल्टर हाऊसवर अवलंबून असलेला संपूर्ण कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, सदरबाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमणमळा, शालिनी पॅलेस, मुक्त सैनिक वसाहत, मार्केट यार्ड, सी. बी. एस. स्टेशन रोड, साईक्स एक्स्टेंशन, न्यू शाहूपुरी, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी व्यापारपेठ, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरीतील गल्ली क्रमांक १ ते ४, बी. टी. कॉलेज, संपूर्ण टेंबलाईवाडी व पाच बंगला परिसर आदी भागांत पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

◼️पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
वीजपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीत पर्यायी पंपिंग व्यवस्थेद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असला, तरी शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes