बिगर शासकीय संस्थांच्या वित्तीय व्यवस्थापन व लेखांकनाविषयी विद्यापीठात १० जानेवारीला व्यवस्थापन विकास कार्यक्रम
schedule02 Jan 26 person by visibility 44 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या वतीने "बिगर शासकीय संस्थांचे वित्तीय व्यवस्थापन व लेखांकन (Financial Management and Accounting of NGOs)" या विषयावर व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे (Management Development Programme) आयोजन दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मानव्यशास्त्र सभागृहात करण्यात आले आहे. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM USHA) अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, संचालक, सभासद तसेच चार्टर्ड अकाउंटंट, शिक्षक व विद्यार्थी यांना सदर कार्यक्रम उपयुक्त असणार आहे. सामाजिक संस्थांसाठी निधीचे विविध स्रोत, निधी उभारणी, निधीचा योग्य विनियोग, संस्थांचे लेखांकन, नियमन व अहवालांचे अनुपालन इत्यादी महत्वाच्या विषयांवर सत्रांचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिविभागप्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.





