SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतीय लोकशाहीचा पोलादी आराखडा: राष्ट्रीय नागरी सेवा दिनकोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्र

जाहिरात

 

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश; आठ पैकी हैदराबाद गॅझेटसह सहा मागण्या मान्य; आंदोलकांचा विजयोत्सव

schedule02 Sep 25 person by visibility 641 categoryराज्य

मुंबई  : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु होते. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटची मागणी सरकारने मान्य केली  या गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठीचा जीआर काढल्यानंतर तसेच अन्य मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले उपोषण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.  यावेळी उपोषण सोडताच मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचे पहावयास  मिळाले. यावेळी आझाद मैदानावर शेकडो आंदोलकांनी विजयोत्सव साजरा केला.

मराठा आरक्षणासाठी मागील पाच दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील भावूक झाले. सरकारकडून 6 मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. एकीकडे आझाद मैदानावर शेकडो आंदोलक विजयोत्सव साजरा करत होते. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील भावूक झालेले दिसले. 

 गेल्या अनेक वर्षांपासूनच हा लढा सुरू होता. अनेक वेळा जरांगे हे उपोषनाला बसले होते. मागच्या चार दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला होता. आज अखेर सरकारने त्यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी सरकारचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes