SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्र

schedule20 Apr 26 person by visibility 174 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : महात्मा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची १५३ वी जयंती या संयुक्त निमित्ताने येत्या गुरूवारी (दि. २३) शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन यांच्या वतीने विद्यापीठातील मानव्यशास्त्र सभागृहात ‘महात्मा फुले आणि महर्षी शिंदे: अनुबंधांचा अन्वयार्थ’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे.


महात्मा फुले (१८२७-१८८०) व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांची आधुनिक कालखंडातील कृतिशील समाजसुधारक म्हणून ओळख आहे. महात्मा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात सामाजिक सुधारणेचा व समतेचा पाया घातला. भारतातील अनेक सामाजिक चळवळींचे स्रोत फुले यांच्या कार्यात आहेत. यासाठी महात्मा फुले यांनी केलेले वैचारिक व ललित लेखन अतिशय मौलिक आहे. तसेच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय स्तरावर केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. महात्मा फुले व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य आणि विचारविश्वात अनेक अनुबंध आहेत. याच अनुबंधांचा अन्वयार्थ लावण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित केले आहे.


चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस करणार आहेत. प्रा. सुशील धसकटे बीजभाषण करणार आहेत. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी असतील. दुसऱ्या सत्रात ‘महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या कार्याचा अन्वयार्थ’ या विषयावर मांडणी होईल. या सत्रामध्ये ‘महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांचे स्त्रीविषयक कार्य व दृष्टिकोन’ या विषयावर उद्धव धुमाळे (पुणे), तर ‘महर्षी शिंदे यांच्या वाङ्मयातील फुले अनुबंध’ या विषयावर प्रा. प्रकाश पवार (कोल्हापूर) हे मांडणी करतील. ‘महर्षी शिंदे यांचे कार्य: महात्मा फुले कार्याचा विस्तार’ या विषयावर रमेश चव्हाण (पुणे) बोलतील. द्वितीय सत्र ‘महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या कार्याचा सामाजिक-सांस्कृतिक अनुबंध’ या विषयावर असेल. यामध्ये डॉ. भक्ती महाजन (गोवा), डॉ. सुरेश शिखरे (कोल्हापूर), मोहसीन पठाण (कोल्हापूर) हे मांडणी करतील. प्रा. नंदकुमार मोरे सत्राध्यक्ष असतील. समारोप सत्रात प्राचार्य डॉ. शंकरराव कदम (कराड) मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी प्रा. प्रकाश पवार असतील. या चर्चासत्रात महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व अभ्यासक यांना सहभागी होण्याचे आवाहन मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes