SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती पुरस्कार जाहीरश्वास, ध्यास आणि जगण्याचं शास्त्र... रंगभूमी!कांचनताई परुळेकर यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली - महापौर रूपाराणी निकम; स्मृतीदालनाचे उद्घाटनसुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येगडेशिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात 'आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा' उत्साहातघरफाळा दंड सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 1.22 कोटींची वसुलीहत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत" योजना प्रभावीपणे राबवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरसावधान! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; बळीराजाची धाकधूक वाढली!'सहज सेवा ट्रस्ट'चे ज्योतिबा डोंगरावर सलग २६ व्या वर्षी भव्य अन्नछत्र; यंदा दोन लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद!

जाहिरात

 

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती पुरस्कार जाहीर

schedule27 Mar 26 person by visibility 103 categoryसामाजिक

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ या वैचारिक लेखसंग्रहाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद नारायणे यांनी ही घोषणा केली आहे.

डॉ. जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक व्हाईट अन् ग्रे’ या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने उत्कृष्ट ललित संग्रहासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर आता ‘समाज आणि माध्यमं’ या पुस्तकाला महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वैचारिक साहित्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये ६,००० रोख रक्कम, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वर्धा येथील स्थानिक सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक व 'उपरा'कार लक्ष्मण माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ करण्यात येईल, असे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज नारायणे, राहूल भस्मे, जिगिषा नारायणे यांनी कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes