विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या
schedule30 Sep 24 person by visibility 267 categoryगुन्हे
चिकोडी : रायबाग तालुक्यातील बोमनाळ या गावी कौटुंबिक वाद झाल्याने विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली.
यल्लव्वा करीहोळ (वय ३०), सात्विक करीहोळ (वय ५), मुतप्पा करीहोळ (वय १ वर्ष) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात बोमनाळ या गावात यल्लव्वा करीहोळ या पतीसोबत राहत होत्या. मात्र त्यांच्यात वारंवार भांडण होत असे. त्यामुळे नैराश्येतून दोन मुलांसह यल्लव्वा हिने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी रायबाग पोलीसानी भेट देऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले.