कोल्हापुरात राजाराम कारखान्याच्या बॉयलरला भीषण आग; दीड तास शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
schedule28 Feb 25 person by visibility 477 categoryगुन्हे

कोल्हापूर : कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मिलला आज, शुक्रवार सकाळी १०:४० च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पेठवडगाव नगरपालिकेची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. दीड तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याचे समजते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
दोनच दिवसांपूर्वी कारखान्याचा गळीत हंगाम संपला होता. दरम्यान, आज सकाळी राजाराम कारखान्यात आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आगीचे धूर लांबून सुद्धा दिसून येत होते. दीड तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आग आटोक्यात आणण्यात आली.
आगीमध्ये कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.