वारणा विद्यापीठाचा एफ.एच.एम युनिव्हर्सिटी ऑफ अप्लायड सायन्सेस जर्मनी यांच्यासमवेत सामंजस्य करार
schedule24 Jan 25 person by visibility 340 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : वारणा विद्यापीठ (महाराष्ट्रातील पहिले राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठ) व एफ.एच.एम युनिव्हर्सिटी ऑफ अप्लायड सायन्सेस जर्मनी यांच्यामध्ये यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. या करारावर वारणा विद्यापीठाकडून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास व्ही.कारजिन्नी व एफ.एच.एम युनिव्हर्सिटीचे कुलगुरु, प्रो.डॉ. वोलकर विटरबर्ग यांनी स्वाक्षरी केल्या. करारावेळी, अधिष्ठाता, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. एस. एम. पिसे उपस्थित होते. हा करार होटल सोफिटेल मुंबई बीकेसी येथे पार पडला.
या करारासाठी अभय केळकर, संचालक, महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर व तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बी. टी. साळोखे यांचे सहकार्य लाभले. एफ.एच.एम विद्यापीठाच्या कुलगुरूंनी यावर्षी मार्च महिन्यामध्ये वारणा विद्यापीठाला भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. एफएचएम युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्स हे जगविख्यात जर्मन कंपनी सिमेन्स यांच्या सहकार्यातून स्थापित झालेले ख्यातनाम विद्यापीठ असून संपूर्ण जर्मनीमध्ये या विद्यापीठाचे दहा कॅम्पस आहेत.एफएचएम युनिव्हर्सिटी जर्मनी हे युनिव्हर्सिटी ऑफ ग्लॉसेस्टरशायर युके व ब्रिटिश कॉमेंट याच्या संयुक्त विद्यमाने अनेक कोर्स राबवले जात आहेत.
या कराराच्या यशस्वीतेबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढणार असून विद्यार्थ्यांना संशोधन, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक प्रकल्पांसाठी नवनवीन संधी मिळणार आहेत.संयुक्त संशोधन, परदेशात सेमिस्टर आणि इंटर्नशिप, पदवी व पदव्युत्तर शिक्षणश (२+२ पदवीपूर्व, १+१ पदव्युत्तर), संयुक्त पदवी कार्यक्रम व इतर उपक्रम राबवण्याची संधी मिळेल.या सामंजस्य करारामुळे मेकॅनिकल, एन्व्हायरमेंटल, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, ऑटोमोबाईल मोबिलिटी, एमबीए असे अनेक अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध होणार असून या अभ्यासक्रमानंतर या विद्यार्थ्यांना जर्मनी बरोबरच संपूर्ण युरोपमध्ये मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.