SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभा

schedule05 Apr 26 person by visibility 388 categoryदेश

नवी दिल्ली : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून दिग्गज नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. कूचबिहार आणि अलीपुरद्वार येथील सभांमध्ये बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यास सर्व घुसखोरांना हकलून देण्याची मोठी ग्वाही दिली.

 दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद येथील सभेतून भाजप आणि निवडणूक आयोगावर पलटवार करत, राज्यातील विकासकामांत अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याचे आश्वासनही दिले आहे.

दक्षिण भारतात केरळमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोड शो आणि जाहीर सभांच्या माध्यमातून यूडीएफ (UDF) आणि एलडीएफ (LDF) या दोन्ही आघाड्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत केरळच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'राजस्व' सरकारला निवडून देण्याचे आवाहन केले.

 त्याचवेळी आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहा समुदायांना अनुसूचित जाती-जमातीचा दर्जा देण्याचे आणि चहा मळ्यातील कामगारांना दररोज ४५० रुपये मजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पाचही राज्यांमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरली जाणारी ६५० कोटींहून अधिक किमतीची रोकड, दारू आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, यात पश्चिम बंगाल ३१९ कोटींसह अव्वल स्थानावर आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes