SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एनसीसी भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्नमान्सूनपूर्व तयारीचा आढावा: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची प्रत्यक्ष पाहणीराधानगरी येथील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश नोंदणी सुरूडीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे निवडसैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी 8 जून रोजी मुलाखतपद्मश्री डॉ. ग. गो जाधव यांना विद्यापीठात अभिवादनकोल्हापुरात ‘चालुक्य क्रीडा महोत्सव २०२६’ चा थरार; १७ मे पासून १० विविध खेळांचे विनामूल्य आयोजनपर्यावरणाचा समतोल आणि मधमाशी दिनकोल्हापूर : अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेशकोल्हापूर जिल्ह्यात 2 जूनपर्यंत बंदी आदेश लागू

जाहिरात

 

एनसीसी भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्न

schedule20 May 26 person by visibility 79 categoryराज्य

कोल्हापूर :   राष्ट्रीय छात्रसेना (NCC) अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर – CATC 304 11 ते 20 मे या कालावधीत NCC भवन, कोल्हापूर येथे उत्साहात पार पडले. हे शिबिर 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, NCC, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये एकूण 350 कॅडेट्स सहभागी झाले होते.

शिबिरादरम्यान कॅडेटना ड्रिल, शस्त्र हाताळणी, फायरिंग, नकाशा वाचन, प्राथमिक उपचार आणि फिटनेसचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वाहतूक नियम पालन, भारतीय सैन्यात प्रवेशाची माहिती आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांतील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. तसेच यावेळी कॅडेटनी स्वच्छ भारत अभियान आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर जनजागृती उपक्रम राबवले. या शिबिरामुळे कॅडेट्समध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त व राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली.

शिबिराचे आयोजन कर्नल विक्रम एस. नलवडे, कमांडिंग ऑफिसर, ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, एनसीसी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी अधिकारी, सहायक एनसीसी अधिकारी आणि प्रशिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes