SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दुधगंगा काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधकाचे काम गतीने पूर्ण करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकरबनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार : मंत्री नरहरी झिरवाळआरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवातडी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याची १०० वी मोफत शस्त्रक्रिया यशस्वी; ‘द स्पाइन फौंडेशन’च्या सहकार्याने उपक्रम‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प; विद्यापीठाचे मोठे यश; संशोधकीय दर्जावर राष्ट्रीय मोहोरभारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षणकोल्हापूर जिल्ह्यात 1 मे पर्यंत बंदी आदेश लागूप्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं,’ येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी, हिमाचल प्रदेश यांच्यात सामंजस्य करारऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जाहिरात

 

येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

schedule21 Jun 24 person by visibility 371 categoryराज्य

  मुंबई : मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रदूषणात वाढ होत असल्याने यावेळी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली. यामुळे मुंबई शहर प्रदूषणमुक्त होवू लागले आहे. येत्या दोन वर्षात मुंबईचा चेहरा बदलण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे मुंबईतील प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिका आणि आय लव्ह मुंबई यांच्यातर्फे मरीन ड्राईव्ह येथे आयोजित सुशोभीकरण प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, माजी मुख्य न्यायाधीश मोहित शांतीलाल शाह, शायना एनसी, जॅकी श्रॉफ आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते फीत कापून वारली पेंटिंग, योग मुद्राचे उद्घाटन करण्यात आले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांनी पाहणी केली.

 मुख्यमंत्री शिंदे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन म्हणाले, मरीन ड्राईव्ह येथे सुंदर सुशोभीकरण केले आहे. नाना चुडासामा यांचे सामाजिक काम महत्वपूर्ण असून मुंबईत विविध सुशोभीकरणासाठी त्यांनी हातभार लावला आहे. नाना चुडासामा यांचे काम शायना एनसी पुढे चालवित आहेत. शासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुंबई स्वच्छ, सुंदर आणि हरित बनविण्यात येणार आहे. सर्व रस्ते सिमेंटचे करणार असल्याने खड्डेमुक्त शहर होण्यास मदत होईल. जुलैपर्यंत सी लिंकपर्यंत संपूर्ण काम होईल, कोस्टल रोड, मेट्रो यामुळे नागरिकांना वाहतूक समस्येतून दिलासा मिळाला आहे. शायना एनसीमुळे भायखळा स्टेशनला युनेस्कोचा पुरस्कार मिळाल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला.

   योगाचे महत्व अधोरेखित करणारे योगाचे पोस्टर्स आकर्षक असल्याचाही उल्लेख यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

▪️रोज योग करा
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यातूनच 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ जगभरात साजरा केला जात आहे. योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योगा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes