SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरमध्ये रंगपंचमी उत्साहात; तरुणाईचा जल्लोषएमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रामीण भागातील 42 अनधिकृत व थकबाकीपोटी 3 नळ कनेक्शन खंडीत...आता शेतातच समजणार पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव; कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित उपकरण संशोधनाला मिळाले पेटंटखुनाचा गुन्हा उघडकीस; चार आरोपींना अटक; पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगीरी कोल्हापूर : तहसिलदारांकडून प्रलंबित कामे करून देण्यासाठी पाच लाखाची घेतली लाच; पंटरला अटक, शाहूवाडी तालुक्यात खळबळडी.के.टी.ई. मध्ये ‘टेक-सिंपोझियम २५‘ आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक स्पर्धा उत्साहात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सुधारणा करण्यावर भर : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरमहात्मा बसवेश्वर यांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठतुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक: डॉ. श्रीरंग गायकवाड

जाहिरात

 

खुनाचा गुन्हा उघडकीस; चार आरोपींना अटक; पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगीरी

schedule19 Mar 25 person by visibility 1098 categoryगुन्हे

कोल्हापूर  : पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगीरी करत बेवारस व अनोळखी मयताचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. प्रशांत पांडुरंग कसबले (रा. देसाईवाडी ता. चंदगड जि. कोल्हापूर) असे मयताचे नांव आहे. या प्रकरणात 1) सागर धुळाप्पा बंडगर, (वय-38 रा. मातंग गल्ली, मौजे खेबवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर),  2) शुभम खानु मेटकर (वय-24 रा. जरगवाडी मौजे महे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) 3 ) कृष्णात शिंगाप्पा धनगर, (वय-46 रा. धनगर गल्ली मौजे आडूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) 4) गोरख शिंगाप्पा धनगर, (वय-52 रा.धनगर गल्ली मौजे आडूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पन्हाळा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी अंबुधाळ नावाचे परिसरात डोगर भागात कणेरी गांवचे हद्दीत पुरुष जातीचे अर्धवट सडलेल्या मयत स्थितीत मिळून आलेने पन्हाळा पोलीस ठाणेकडे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोसई  कोंडुभैरी हे करीत होते.

 मयताचे तपासा दरम्यान मयता जवळ पुसटसा मोबाईल क्रमांक असलेली एक कागदाची चिठ्‌ठी मिळून आली. त्याचा तपास पोसई  कोंडुभैरी व पोहेकों 1538 समीर मुल्ला हे करीत असताना त्यांना सदर चिठ्‌ठीवरील नंबर वरून प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकावरून खात्री केली असता तो मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या दुकानदाराचा असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी त्याच्याजवळ रिपेअरींग करीता आलेल्या मोबाईलबाबत माहिती घेतली असता एक मोबाईल दुकानदाराकडे बऱ्याच दिवसापासुन दुरूस्ती करीता पडुन होता व सदर मोबाईल धारकाने दुकानदाराच्या मोबाईल वरून त्याच्या मित्रास फोन केला होता. त्यानुसार त्याच्या मित्राकडे व नातेवाईकांकडे चौकशी केली असता सदर मोबाईल हा प्रशांत पांडुरंग कसबले रा.देसाईवाडी ता. चंदगड जि. कोल्हापूर याचा होता व तो मजुरी कामाकरीता कोल्हापूर येथे गेला असल्याचे समजले. तसेच बऱ्याच दिवसापासुन त्याच्याशी संपर्क झाला नसल्याचे सांगितले.

त्यानंतर कोल्हापूर बस स्थानक येथे बाहेरून मजुरी करीता येणाऱ्या बाबत चौकशी केली असता काही मजुर पुरवणाऱ्या इसमां बाबत माहिती घेतली असता मजुर पुरवणाऱ्यापैकी एकजण खेबवडे ता. करवीर जि. कोल्हापूर येथील असल्याचे समजले व इसम नामे प्रशांत कसबले याच्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषणावरून खेबवडे हे ठिकाण निश्चीत झाल्याने सदर मजुर पुरवणारा इसम नामे सागर बंडगर रा. खेबवडे ता. करवीर जि. कोल्हापूर याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने इसम नामे प्रशांत पांडुरंग कसबले रा. चंदगड यास बकरे राखण्याच्या काम देतो असे सांगुन त्यास मौजे खेबवडे येथे घेवुन गेला होता. त्यानंतर त्यास मौजे महे ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील शुभम मेटकर याच्याकडे मजुर पुरविण्याच्या बदल्यात मोबादला घेवुन प्रशांत यास पाठविले होते.

प्रशांत हा दोन दिवस तेथे काम करून पळून गेला होता त्यास शुभम याने मध्यवर्ती बस स्थानक, कोल्हापूर येथुन परत आणून त्यास काम सोडून पळून गेल्याच्या रागातुन लाकडी दांडक्याने व लामाबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर त्यास खेबवडे ता. करवीर येथे नेचुन आरोपी  सागर बंडगर रा.खेबवडे याच्याकडे सोडले होते. त्यानंतर आरोपी सागर बंडगर व आरोपी शुभम मेटकर यांनी मयत प्रशांत पांडुरंग कसबले यास काम सोडुन पळुन गेल्याच्या रागातून पुन्हा गंभीर मारहाण केली व त्यानंतर आरोपी सागर बंडगर याने  आरोपी कृष्णात धनगर व गोरख धनगर यांचेकडे कामास पाठविलेनंतर त्यांच्याकडे कामास असताना तो गंभार जखमी असल्याचे माहित असुन देखील  त्याच्यावर कोणतेही उपचार न केल्यामुळे तो मयत झाला व मयत झाले नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कोणासही काहीही न सांगता मयताच आरोपी कृष्णा धनगर व गोरख धनगर  यांनी आपले कडील घोडयावर प्रेत लादुन रात्रीच्या वेळेस मौजे कणेरी व करंजफेण या गावाच्या दरम्यानचे जंगल भागात डोंगर उतारावर नेवून तेथे टाकले याबाबत सर्व आरोपींनी कबुली दिली आहे.

 पुरुष जातीचे अनोळखी प्रेत पुर्णपणे कुजलेल्या स्थितीत मिळून आल्यानंतर मयताची ओळख पटण्याची कोणतेही चिन्हे नसताना केवळ मयताच्या पँटचे खिशातील मिळून आलेल्या चिठ्‌ठीच्या आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे मयताची ओळख पटवुन यातील आरोपी निष्यत्र करून सदरचा गुन्हा दोन महिन्यानंतर उघडकीस आणलेला आहे. सदर बाबत पन्हाळा पोलीस ठाणेकडील तपास पथकाने चंदगड तालुका, करवीर तालुका व कोल्हापूर शहर या ठिकाणी तपास केलेला आहे.

 पोलीस अधीक्षक कोल्हापुर  महेन्द्र पंडीत, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग, कोल्हापुर  आप्पासो पवार यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी संजय बोंबले सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास पथकातील पोसई महेश कोंडभैरी,  समिर मुल्ला,  पाटील, वायदंडे, रविंद्र कांबळे यांनी केलेली आहे. तसेच तांत्रीक विश्लेषण साठी सायबर पोलीस ठाणे पोनि  होडगर व  म्हेत्रे व अंमलदार यांनी मदत केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes