SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करण्यास मान्यताशिवाजी विद्यापीठाचा इन्फ्राप्लान समुहासमवेत सामंजस्य करार; जलविद्याविषयक संशोधनाला गती मिळणारराष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएच.डी.अंबाबाई मंदिराचे जतन-संवर्धन योग्य मार्गावर: पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले पाणीगळतीचे कारण!ऑनलाईन सेवांचा विस्तार करा; नागरिकांना घरी बसूनच सेवा मिळाल्या पाहिजेत : राज्य आयुक्त सुधाकर तेलंगपंजाबमध्ये भाजपची घोडदौड: जनसंपर्क मोहिमेद्वारे पक्ष बळकटीकरणावर भर!फिफा वर्ल्ड कप २०२६: फ्रान्स विरुद्ध स्पेन - महासंग्रामाची रंगत!विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अभाविप आक्रमक; विविध मंत्र्यांची भेट घेऊन केली मागण्यांची जोरदार मांडणीशार्क अवेअरनेस डे: महासागराच्या ‘रक्षक’ शिकारीबद्दल घ्या जाणून!

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाचा इन्फ्राप्लान समुहासमवेत सामंजस्य करार; जलविद्याविषयक संशोधनाला गती मिळणार

schedule14 Jul 26 person by visibility 95 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :जलसंपदाविषयक पायाभूत अभियांत्रिकी सुविधा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इन्फ्राप्लान समुहासमवेत शिवाजी विद्यापीठाने नुकताच सामंजस्य करार केला. संशोधन, कौशल्य विकास व उद्योग-शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देश करारामागे असून आधुनिक संशोधनाच्या दृष्टीने दोन्ही संस्थांमध्ये ज्ञान, तंत्रज्ञान व अनुभवांचे आदानप्रदान होऊन विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रासाठी नव्या संधी उपलब्ध होतील.

इन्फ्राप्लान समूह गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ जलसंपदा व पायाभूत सुविधा क्षेत्रात विशेष अभियांत्रिकी सेवा प्रदान करत आहे. समूहामध्ये इन्फ्राप्लान इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि., सिग्मा इन्फ्राप्लान इंजिनिअरिंग प्रा. लि. तसेच इन्फ्राप्लान हायड्रॉलिक लॅबोरेटरी यांचा समावेश आहे. विद्यापीठातील भूगोल अधिविभाग आणि हवामान बदल व शाश्वतता अभ्यास केंद्रामध्ये जलविद्याविषयक संशोधन सुरू असून या संशोधनाला उद्योग क्षेत्राची जोड मिळण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.

या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, औद्योगिक प्रशिक्षण, लाईव्ह इंडस्ट्री प्रोजेक्ट्स, संयुक्त संशोधन, कौशल्य विकास, नवोपक्रम, स्टार्टअप्स, पेटंट विकास तसेच विविध सरकारी संशोधन प्रकल्पांमध्ये सहकार्याची संधी मिळणार आहे. उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे यावेळी भूगोल अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी सांगितले.

सामंजस्य करारावर कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि इन्फ्राप्लान समुहाचे संचालक आशिष अभय दोशी यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. गणेश न्हिवेकर आणि डॉ. सोमनाथ पवार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes