SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचा इन्फ्राप्लान समुहासमवेत सामंजस्य करार; जलविद्याविषयक संशोधनाला गती मिळणारराष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएच.डी.अंबाबाई मंदिराचे जतन-संवर्धन योग्य मार्गावर: पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले पाणीगळतीचे कारण!ऑनलाईन सेवांचा विस्तार करा; नागरिकांना घरी बसूनच सेवा मिळाल्या पाहिजेत : राज्य आयुक्त सुधाकर तेलंगपंजाबमध्ये भाजपची घोडदौड: जनसंपर्क मोहिमेद्वारे पक्ष बळकटीकरणावर भर!फिफा वर्ल्ड कप २०२६: फ्रान्स विरुद्ध स्पेन - महासंग्रामाची रंगत!विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अभाविप आक्रमक; विविध मंत्र्यांची भेट घेऊन केली मागण्यांची जोरदार मांडणीशार्क अवेअरनेस डे: महासागराच्या ‘रक्षक’ शिकारीबद्दल घ्या जाणून!आर.के.नगर, मोरेवाडी, पाचगावला ३ दिवसांतून एकदा पाणी देऊ : महापौर रुपाराणी निकम

जाहिरात

 

राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधन

schedule14 Jul 26 person by visibility 225 categoryसामाजिक

कोल्हापूर :  राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष, माजी महामंत्री साथी भरत कल्लाप्पा लाटकर ऊर्फ काका (वय 89, रा. नक्षत्र पार्क, कदमवाडी रोड) यांचे मंगळवारी (दि. 14) निधन झाले. बुधवारी (दि. 15) सकाळी 8.30 वाजता सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवून सकाळी 9.00 वाजता तेथून डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल, कदमवाडी पर्यंत अंत्ययात्रा काढली जाणार आहे. भरत लाटकर यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता, त्यानुसार डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये देहदान केले जाणार आहे. आंतरभारती शिक्षण मंडळाचे ते संचालक होते. कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेता राजेश लाटकर यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

भरत लाटकर यांचा जन्म 1 ऑगस्ट 1938 रोजी अब्दुललाट, (ता. शिरोळ) येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून राष्ट्र सेवा दल या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी चळवळीत सहभाग घेतला. सुरुवातीच्या काळात त्यांनी इचलकरंजी येथे यंत्रमाग कामगार म्हणूनही काम केले. त्यानंतर ते महावीर महाविद्यालयात अल्पकाळ प्राध्यापक होते.

गुरुवर्य अनंतराव आजगावकर यांच्या मार्गदर्शनातून कमवा व शिका या ब्रिद वाक्यानुसार शिक्षण घेतले. पुढे आजगावकर सरांनी उत्तुर (ता गडहिंग्लज) येथे आपल्याच शाळेत लाटकर यांना शिक्षक म्हणून नोकरीस घेतले.

 आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर या संस्थे अंतर्गत कोरगावकर हायस्कूल, वि. स. खांडेकर, वालावलकर हायस्कूल आदी ठिकाणी लाटकर यांनी 35 वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली.

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते, माजी शिक्षण मंत्री सदानंद वरती ज्येष्ठ समाजाचे नेते बाबा आढाव, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्यासोबत त्यांनी सामाजिक चळवळीत काम केले. राष्ट्र सेवा दलाचे शाखानायक म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. पुढे त्यांनी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषविले.

 देशभक्तीपर गीतगायनामध्ये लाटकर यांचा मोठा हातखंडा होता. एकाच वेळेला पंधरा हजार विद्यार्थ्यांच्याकडून एकसुरात समुहगीत म्हणून घेऊन त्यांनी विक्रम केला होता.

लाटकर यांनी अध्यक्ष पद आणि महामंत्री पदाच्या कालावधीत फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर राष्ट्र सेवा दलाचे काम पोहोचवले. गेली ४० वर्षे कोरगांवकर हायस्कूलच्या मैदानावर न चुकता राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरू आहे. त्यामध्ये लाटकर यांचे योगदान मोठे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes