SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यापीठाच्या एम.एस्सी. जिओइन्फॉर्मेटिक्सच्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट; पहिल्याच तुकडीचे मोठे यशरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम उत्साहातदशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाबरोबरच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरील तीन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत; अक्षरगप्पांमध्ये व्ही .बी. पाटील यांची माहितीपनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील : मंत्री ॲड. आशिष शेलारग्रेट बॉम्बे सर्कस दाखल; कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता येणारपारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमशिवाजी विद्यापीठाचा सॉफ्टबॉल महिलांचा संघ जाहीर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : शाळा संकुल प्रभावी व्यवस्थापन

जाहिरात

 

कोल्हापूर : गांधीनगर येथे युवकाचा खून; अवघ्या तीन तासात गुन्हयाचा छडा लावुन ५ आरोपीसह २ विधिसंघर्षग्रस्त बालके ताब्यात

schedule11 Jan 25 person by visibility 911 categoryगुन्हे

कोल्हापूर  : गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खुनाचे गुन्हयाचा अवघ्या तीन तासात छडा लावुन ५ आरोपी यांना जेरबंद करण्यात आले तसेच दोन विधीसंर्घषग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गांधीनगर व करवीर पोलीसांनी संयुक्तपणे केली
याबाबत अधिक माहिती अशी की,  दिनांक १० जानेवारी रोजी रात्रौ २२.३० वा. विठठल उर्फ बबलु सुभाष शिंदे (रा. कोयना कॉलनी गांधीनगर ता. करवीर जिल्हा कोल्हापूर ) याचा अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन गांधी पुतळा येथे असल्या बागेजवळील रोडवर धारदार हत्याराने वार करुन, त्याचा खुन केला. घडलेल्या प्रकाराबाबत माहिती मिळताच व घटनेचे गांभीर्य ओळखुन कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित , यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गांधीनगर पोलीस ठाणे यांना समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.

या गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन त्याचा शोध घेणे करीता करवीर विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर, त्याचप्रमाणे गांधीनगर पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक श्री सागर वाघ यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्तिकरीत्या विविध पथके तयार करुन सदरचा गुन्हा करणारे आरोपी कोण असावेत याची माहिती घेतली असता, प्राथमीक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा शलमन उर्फ शल्या कांबळे, प्रथमेश कानडे, शुभम आवळे, रोहन सोनवणे, गौरव माने, समीर उर्फ नॉटी नदाफ, सोमनाथ भोसले यांनी मिळुन केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

करवीर विभाग, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, व गांधीनगर पोलीस ठाणे कडील अधिकारी अमंलदार यांचे पथकांनी सदर आरोपीचा शोध घेणे करीता तांत्रीक व गोपनीय माहिती प्राप्त करुन विविध ठिकाणावरुन १) शलमन उर्फ शल्या सुरेश कांबळे वय-२२ रा.इंदीरानगर झोपडपटटी गांधीनगर, २) प्रथमेश लक्ष्मण कानडे वय २२ रा. इंदीरानगर गांधीनगर, ३) शुभम गणेश आवळे, वय २१ रा. गांधीनगर, ४) समीर उर्फ नॉटी दावलसाहब नदाफ, वय २३ रा. गांधीनगर, ५) सोमनाथ दत्ता भोसले, वय २३ रा. गांधीनगर यांचेसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालक अशांना अवघ्या तीन तासात ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता. गेल्या दोन दिवसापुर्वी मयत व यातील विधिसंघर्षग्रस्त बालक यांचेत झालेल्या किरकोळ वादाचा मनात राग धरुन यातील मयत याचा खून करण्याचा आरोपी यांनी कट रचला होता.

 त्याप्रमाणे काल दिनांक १०/०१/२०२५ रोजी यातील मयत विठठल सुभाष शिंदे हा रात्रौ २२.३० वाचे सुमारास ग्रामिण रुग्नालय ते शिरु चौकाकडे जाणारे रोडने एकटाच मोटर सायकलीवरुन जात असताना वर नमुद आरोपीसह विधिसंघर्षग्रस्त बालक यांनी त्याला वाटेत अडवुन त्यांचेकडील चाकु व कोयत्याने त्याचे डोकीत, पोटावर, हातावर गंभीर स्वरुपाचे वार करुन त्याचे डोक्यामध्ये दगड घालुन त्याला  ठार मारुन तेथुन पळुन गेले होते. घडलेल्या प्रकारा बाबत गांधीनगर पोलीस ठाणेस मयत याचा भाऊ मंगेश सुभाष शिंदे रा. कोयना कॉलनी यांने दिले फिर्यादी प्रमाणे गांधीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि.न.१३/२०२५ भा न्या.स कलम १०३,१८९(२), १९१(२),१९०, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (१), २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

सदरचा गुन्हा घडले पासुन वरिष्ठांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गांधीनगर पोलीस ठाणे कडील अधिकारी अमंलदार यांनी संयुक्तीकरित्या कामगीरी करुन अवघ्या तीन तासात गुन्हयाचा छडा लावुन गुन्हयातील ५ आरोपीसह २ विधिसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले असुन सदर गुन्हयाचा तपास मा. सुजितकुमार क्षिरसागर, उप विभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई सारे यांचे मार्गदर्शना प्रमाणे उप विभागीय पोलीस अधिकारी  सुजित क्षिरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा पोलीस निरीक्षक  चेतन मसुटगे, पोलीस उप निरीक्षक, जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने, अमित सर्जे, वैभव पाटील, लखन पाटील, शुभंम संकपाळ, शिवानंद मठपती, सुशिल पाटील, नामदेव यादव, गांधीनगर पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक  सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक विनायक झुंजुरगे, वर्षा डाळींबकर, पोलीस अमंलदार बजरंग हेब्बाळकर, सचिन सावंत, रोहन चौगुले, करवीर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक नाथा गळवे, पोलीस अमंलदार योगेश शिंदे, दिग्वीजय पाटील, सुनिल देसाई अशांनी कारवाईमध्ये भाग घेतला होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes