ग्रेट बॉम्बे सर्कस दाखल; कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता येणार
schedule27 Apr 25 person by visibility 273 categoryमनोरंजन

कोल्हापूर : पूर्वीच्या काळी सर्कस येतात लहान मुलांसह आबाल वृद्धांच्या मनाला आनंद मिळून जात होता कारण सर्कस येण्याआधीच लहान मुलांना पालक वर्ग या ठिकाणी सहभागी असणाऱ्या प्राण्यांना दाखविण्यासाठी आणले जात होते आता मात्र शासनाने बंदी घातल्याने सर्कस मध्ये जरी जनावरांचा समावेश नसला तरी वेगवेगळ्या सादरीकरणातून निखळ मनोरंजन करण्यासाठी ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येत्या शुक्रवारपासून सुरू झाली आहे. येथील आयर्नविन ख्रिश्चन मैदान ही सर्कस आली असून या सर्कसच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता आणि पाहता येणार आहे.एअर कूलरसह नावीन्य घेऊन तब्बल १५ वर्षानंतर आर्यन ख्रिश्चन हायस्कूल मैदान येथे ही सर्कस दाखल झाली आहे.आज शुक्रवारपासून ही सर्कस सुरू झाली असून. या सर्कसचे उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आले.
सायंकाळी ७.३० वाजता या सर्कसचा पहिला शो सादर करून सर्कसला प्रारंभ झाला.यावेळी कलाकारांनी आपल्या विविध कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
दररोज सायंकाळी साडेचार आणि सायंकाळी साडेसात वाजता असे दररोज दोन शो सादर केले जाणार आहेत. करवीरवासीयांनी तब्बल पंधरा वर्षानंतर कोल्हापुरात दाखल झालेली ग्रेट बॉम्बे सर्कस पहावी असे आवाहन आर.एम.पिल्लई,पप्पल जी,जितेंद्र सिंग यांनी केले आहे.
ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरकरांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन आली असून या सर्कसमध्ये आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश आहे. अफ्रिकन, मणिपुर, नेपाली, रशियन, इथोपियन, बंगाली, आसाम आणि आंतरराष्ट्रीय कलाकार चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत.
कोल्हापूरकरांसाठी उन्हाळा सुट्टी मनोरंजनाची मेजवानी म्हणून ग्रेट बॉम्बे सर्कसचे कलाकार आपल्या चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. ग्रेट बॉम्बे सर्कस जगातील सर्वात जुनी आणि नावाजलेली सर्कस असून या सर्कसची स्थापना १९२० साली झाली आहे.आज या ग्रेट बॉम्बे सर्कसला १०५ वर्षे पूर्ण झाली आहेत.या बॉम्बे सर्कसमध्ये फिर हेराफेरी, धूम, क्रिश, हाथी मेरे साथी, मेरा नाम जोकर, शिकारी, सावधान इंडिया एपिसोड, अमिताभ बच्चनची इन्सानियत, खेल खिलाडी का, तेरी मेहरबानीयाँ अशा विविध चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.सर्कसमध्ये एकूण ४०० कलाकार आणि कर्मचा-यांचा समावेश आहे. ही सर्कस अनेक राज्यात जाऊन आपलं सादरीकरण करून आली आहे. नेपालियन, बंगाली,
मणिपूर अशा आंतरराष्ट्रीय कलाकारांचा ७० फुट उंचीवरील हवेतील कॅचींग झोका, इथोपियन कलाकारांचा बांबू डान्स, फुट जगलिंग, एका डोक्यावरती १० टोप्या फिरविण्याच्या कलाकृती, कोडोलिझा, योकेनिन गेम, पोल बॅलन्सींग, ७ फुट उंच असलेला आणि ७० किलो वजन असलेला अफ्रिकन आर्टिस्ट, अवघ्या एक फुटाच्या सायकलवरती कलाकृती दाखवून डोळयाचे पारणे फेडणारा, सायकल बॅलन्सींग एका मोठया कुव्यामध्ये, ७ मोटारसायकलींग बाईकचा समावेश असलेला कारनामा, २० फुट उंचीवर हवेतील जंपींग, जोकरचे पोट धरुन हसविणारे विविध धमाली विनोद, रशियन मुलींचा ब्रेकडान्स, फायर डान्स, व्हील ऑफ डेथ असे अनेक प्रकारचे आकर्षक खेळ येथे पाहायला मिळणार आहेत.
तरी कोल्हापुरातील रसिक प्रेक्षकांनी या सर्कसचा लाभ घ्यावा असे आवाहन बॉम्बे सर्कसचे व्यवस्थापक आर.एम.पिल्लई
पप्पल जी,जितेंद्र सिंग यांनी केले आहे.यावेळी गजानन मोटे उपस्थित होते.आज ही सर्कस पाहून आमचे धमाल मनोरंजन झाले आहे. याठिकाणी कुत्र्यांना जे प्रशिक्षण दिले आहे हे मनाला भावून गेले आहे अशा प्रतिक्रिया उपस्थित प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.धमाल मनोरंजन करणारी सर्कस कोल्हापूरकरांनी पहावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.