SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दिवाळी झाली, पण लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?बिहार विधानसभा निवडणूक : तेजस्वी यादव महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, तर मुकेश साहनी उपमुख्यमंत्री असतील : अशोक गेहलोत याची घोषणासंरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- संतवाणी संताच्या रचनांवर आधारित‘ कार्यक्रम उत्साहात कोल्हापुरात पाडव्यानिमित्त रंगल्या म्हशींच्या सौंदर्य स्पर्धाबीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात… घरकुल बांधणीत बीड जिल्ह्याने रचला नवा विक्रम!इस्रोच्या स्थापनेतील शिल्पकार डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन टेन्शन वाढलं? : महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व मंत्राच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट होणार३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम : मंत्री ॲड.आशिष शेलारऐन दिवाळीत पावसाची एन्ट्री ; राज्यात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा

जाहिरात

 

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule23 Oct 25 person by visibility 69 categoryराज्य

▪️सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस  प्रकल्पास मिहान येथे २२३ एकर भूखंडाचे वितरण

नागपूर : मिहान आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी २३३ एकर क्षेत्रात अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे संरक्षण उत्पादन उद्योग क्षेत्रात नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता मिळणार असून यामुळे विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीत मोठी भर पडणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री  फडणवीस यांनी व्यक्त केला.

रामगिरी येथे आयोजित कार्यक्रमात मिहान विशेष आर्थिक क्षेत्रातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या २३३ एकर भूखंडाचे वितरण मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना करण्यात आले.

या प्रसंगी संरक्षण उत्पादन कंपनीचे मनीष  नुवाल, राघव नुवाल, जे.एफ साळवे तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे  व्यवस्थपकीय संपादक तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, गौरव उपश्याम, संजय इंगळे आदी उपस्थित होते.

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी राज्यात १२ हजार ८० कोटीची गुंतणूक करुन अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्प  उभारणार आहे.  या प्रकल्पामुळे ६ हजार ८०० प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. तसेच मिहान आर्थिक क्षेत्रात ६८० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करुन विमान व संरक्षण उपकरण निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे. या प्रकल्पामुळे ८७५ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा उपक्रम महारास्ट्राच्या ‘मेक इन इंडिया’ ‘आत्मनिर्भर भारत’ आणि औद्योगिक प्रगतीच्या विकासाठी अधिक बळकटी देणारा ठरणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

मिहान सेझ प्रकल्पातील सर्वात मोठे भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीला वितरीत करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या प्रगत, गुंतवणूकदार अनुकूल धोरणांचा व अग्रगण्य उद्योगांचा वाढता विश्वास यावरून अधोरेखीत होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शासन व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे. उच्च-मूल्य गुंतवणूक आकर्षित करणे, प्रादेशिक रोजगारनिर्मिती वाढवणे आणि संरक्षण व उत्पादन क्षेत्रात राज्याचे नेतृत्व अधिक दृढ करणे हा त्यामागील हेतू असल्याचे यावेळी एमएडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन ईटनकर यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes