SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनवरात्र उत्सवात नवीन वाहन नोंदणीमध्ये २४ टक्क्यांनी वाढजनगणना-२०२७ च्या पूर्वचाचणीसाठी सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन“मोंथा” चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा; परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी वाढणारकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहरच्या ३३ व्या ऊस गाळप हंगामाकरीता मोळी पूजनगोकुळकडून लवकरच ‘गोकुळ केसरी कुस्ती’ स्पर्धा पुन्हा सुरू : नविद मुश्रीफ‘गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कारकोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या (केएमए) वतीने दोन दिवसीय वैद्यकिय परिषदेचे आयोजनवडिलांच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मुलाचे प्राण; 29 लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदतमाझे गांव, माझे राज्य, माझा देश ही भावना प्रत्येकाने जोपासणे आवश्यक : कर्नल अमरसिंह सावंत

जाहिरात

 

नवरात्र उत्सवात नवीन वाहन नोंदणीमध्ये २४ टक्क्यांनी वाढ

schedule28 Oct 25 person by visibility 132 category

मुंबई : केंद्र शासनाकडून दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये केलेल्या बदलांमुळे यावर्षी नवरात्र उत्सवाच्या कालावधीत नवीन वाहन खरेदीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १ लाख २५ हजार ३९९ नवीन वाहनांची नोंदणी झाली असून, हे मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या १,००,९१२ वाहनांच्या नोंदणीपेक्षा तब्बल २४ टक्क्यांनी अधिक आहे, असे परिवहन विभागाचे सह परिवहन आयुक्त (संगणक ) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

वाहन नोंदणीचा तपशील पुढीलप्रमाणे:

दुचाकी वाहने: मागील वर्षी ६६,५८८, यावर्षी ७७,०६१

मोटारकार: मागील वर्षी २१,६२०, यावर्षी ३२,९१२

इतर वाहने (ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक इ.): मागील वर्षी १२,७०४, यावर्षी १५,४२६

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes