कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 71 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई
schedule15 Oct 26 person by visibility 152 categoryमहानगरपालिका
◼️गेल्या दहा दिवसात थकबाकीपोटी रू.62 लाख 59 हजार 398 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकामार्फत शहर व संलग्नीत ग्रामीण भागात थकबाकीदार व अनाधिकृत नळ कनेक्शनविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांचे कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई वेळोवेळी करण्यात येत आहे.
याअंतर्गत गेल्या दहा दिवसात शहर पाणी पुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकाने शहर व ग्रामीण भागातील कारवाईमध्ये थकबाकीपोटी 71 कनेक्शन धारकांवर कारवाई करुन कनेक्शन बंद करण्यात आले. थकबाकीपोटी रु.62 लाख 59 हजार 398 रुपये वसुल करण्यात आले तर 4 अनाधिकृत कनेक्शन खंडीत करण्यात आले. तसेच 2 कनेक्शनधारकांनी मोटीरी वापरलेचे निदर्शनास आल्याने सदरच्या मोटारी जप्त करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे आज राजेंद्रनगर परिसरात शहर पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकामार्फत थकबाकीदार व अनाधिकृत नळ कनेक्शनविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 22 अनाधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले.
सदरची कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने, उपआयुक्त नागेंद्र मुतकेकर व जल अभियंता जयेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये पथक प्रमुख बाळासाहेब पठाण, संजय चौगुले, काका बनसोडे, निरंजन चव्हाण या पथकप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली, शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, सुनिल भाईक, अक्षय आटकर, मयुरी पटवेगार, महानंदा सुर्यवंशी, मिटर रिडर व कर्मचारी यांनी प्रमुख सहभाग घेतला.
यापुढेही अनाधिकृत नळ कनेक्शनविरोधातची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी शहर व ग्रामीण परिसरातील सर्व कनेक्शनधारकांनी आपली पाणीपट्टीची थकबाकी तातडीने भरावी तसेच अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. पाणी चोरी व बेकायदेशीर नळ कनेक्शनला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देऊ नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.