SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
श्री विनय कोरे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहनशिरोळ तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश; आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यशशरद सहकारी साखर कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले : आमदार यड्रावकरकोल्हापूर: घरफाळा थकबाकी व विनापरवाना वापरामुळे दोन मिळकती सील; महापालिकेची ३० लाखांची वसुलीमहायुतीच्या वतीने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा व्यापक मेळावा उद्या बुधवारीकोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिरसराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘माइंडक्राफ्ट हॅकेथॉन’ उत्साहातगोकुळ निवडणूक : ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; १९ ऑक्टोबरला मतमोजणीकोरे अभियांत्रिकीत ‘इल्लूमिनेट २०२६’ उद्योजकता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

जाहिरात

 

श्री विनय कोरे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

schedule14 Oct 26 person by visibility 136 categoryगुन्हे

कोल्हापूर : निलेवाडी, ता. हातकणंगले येथील श्री विनय कोरे ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेतील कथित फसवणूक व अपहार प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५०/२०२४ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पतसंस्थेत ठेवी किंवा गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह चौकशीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

संबंधित गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०८, ४०९ व ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ मधील कलम ३ व ४ अन्वये दाखल आहे. ठेवीदारांना तपासाच्या अनुषंगाने आपली तक्रार व गुंतवणुकीचा तपशील सादर करता यावा, तसेच त्यांची रक्कम परत मिळविण्यासाठी कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही करता यावी, यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे.

उपस्थितीचे वेळापत्रक- ठेवीदार व गुंतवणूकदारांनी दि. १२ ते १६ ऑक्टोबर आणि दि. १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथे उपस्थित राहावे.

आवश्यक कागदपत्रे - गुंतवणुकीचा पुरावा म्हणून मूळ ठेव पावती, प्रमाणपत्र किंवा संबंधित बँक अथवा वित्तीय संस्थेच्या खात्यातून झालेल्या व्यवहाराचे विवरणपत्र (बँक स्टेटमेंट). गुंतवणूकदाराच्या बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची स्पष्ट प्रत. आधार कार्ड व पॅन कार्ड. मिळालेल्या अंशतः किंवा पूर्ण परताव्याचा पुरावा, तसेच व्याजासह परतावा मिळाला असल्यास त्यासंबंधीची पावती किंवा बँक स्टेटमेंट. संबंधित बँक खात्याच्या वारसदारांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व मोबाईल क्रमांक. सर्व कागदपत्रांच्या स्पष्ट व सुस्पष्ट दोन छायांकित प्रती. ठेवीदारांनी नमूद कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून तपासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes