SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'टाटा पॉवर' मध्ये येथील नामांकित केआयटीच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांची घवघवीत निवड​"कळंब्यात मध्यरात्री बिबट्याचा वावर; मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण!"वाचन प्रेरणा दिन: ज्ञानाची क्षितिजे आणि प्रगतीचा पायाश्री विनय कोरे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहनशिरोळ तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश; आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यशशरद सहकारी साखर कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले : आमदार यड्रावकरकोल्हापूर: घरफाळा थकबाकी व विनापरवाना वापरामुळे दोन मिळकती सील; महापालिकेची ३० लाखांची वसुलीमहायुतीच्या वतीने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा व्यापक मेळावा उद्या बुधवारीकोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिरसराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसाद

जाहिरात

 

​"कळंब्यात मध्यरात्री बिबट्याचा वावर; मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण!"

schedule15 Oct 26 person by visibility 147 categoryसामाजिक

करवीर : करवीर तालुक्यातील कळंबा-पाचगाव मार्गावर मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाल्याच्या चर्चेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर थांबलेल्या बिबट्याचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत आणि शिंगणापूर परिसरात बिबट्या आल्याची अफवा पसरली होती. मात्र, यावेळी कळंबा तलाव परिसरातील कळंबा-पाचगाव मार्गावर मध्यरात्री प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मार्गावर थांबलेल्या बिबट्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.

याबाबत माहिती मिळताच कळंबा गावच्या पोलीस पाटील अनिता तिवले यांचे पती अजित तिवले, माजी सरपंच विश्वास गुरव, ग्रामपंचायत सदस्य विकास पवार बावडेकर, रोहित मिरजे यांच्यासह नागरिकांनी सांस्कृतिक मंगल कार्यालयाजवळ धाव घेतली. रात्री दोन ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या होमगार्डना स्मशानभूमी समोरील साई हॉलजवळ हा बिबट्या सर्वप्रथम दिसून आला. त्यांनी गाडी थांबवून त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, तो तलावाच्या दिशेने निघून गेला. अंधारामुळे आणि टॉर्च नसल्याने नेमका तो कुठे गेला हे समजले नाही, परंतु त्यांनी सकाळी फोनवरून याची कल्पना दिली.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ओंकार भोसले, वन्यजीव पथकाचे आशुतोष सूर्यवंशी, अमित कुंभार, ओंकार काटकर, यश खबाळे आणि राजेश शिरके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने या परिसरातील शेतवडीसह कळंबा तलावाचा भराव परिसर आणि कळंबा-पाचगाव मार्गावरील विविध कॉलनीतील परिसराची कसून पाहणी करत शोधमोहीम राबवली. मात्र, दिवसभराच्या शोध मोहिमेत या बिबट्याचा ठांगपत्ता लागला नाही.
अखेर ड्रोनद्वारे बिबट्याच्या शोधाची मोहीम राबवण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या घटनेमुळे कळंबा परिसरात महिलांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना वनविभाागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes