SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'कव्वाली महोत्सवा'चे २१ फेब्रुवारीपासून आयोजनशिवाजी विद्यापीठात उद्या ‘अकौंन्टन्सी म्युझियम ऑफ इंडिया’चे उद्घाटनशिवाजी विद्यापीठात रविवारी नोकरी महामेळाव्याचे आयोजन; ८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती होणार'संशोधन प्रकल्प निधी कसा मिळवावा' या विषयावर शिवाजी वि‌द्यापीठामध्ये उद्या एकदिवसीय कार्यशाळा‘गोकुळ’ कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ : चेअरमन नविद मुश्रीफजागतिक सामाजिक न्याय दिन: समता आणि सन्मानाचा जागरप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात डी वाय पाटील विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी; मेडिकल कॉलेज स्टूडेंट कौन्सिल कडून आयोजन, पालखी, लेझीमच्या तालावर वातावरण शिवमयडॉ. संजय डी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक उपक्रमडॉ. संजय डी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक उपक्रम

जाहिरात

 

'संशोधन प्रकल्प निधी कसा मिळवावा' या विषयावर शिवाजी वि‌द्यापीठामध्ये उद्या एकदिवसीय कार्यशाळा

schedule20 Feb 26 person by visibility 95 categoryराज्य

कोल्हापूर : ‘विविध संशोधन प्रकल्पांसाठी लागणारा निधी कसा मिळवायचा, मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर कसा करायचा आणि त्याची नितीमानता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उद्या, शनिवारी (दि. २१) सकाळी ९ ते २ या वेळेत शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वि‌द्यापीठातील स्कूल ऑफ नॅनो सायन्स अॅड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक तसेच ए.एन.आर.एफ.-पेअर, आयआयएससी-एसयूके स्पोकचे प्रमुख अन्वेषक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी दिली.

प्रा. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार्यशाळा शिवाजी वि‌द्यापीठ तसेच संलग्न महावि‌द्यालयांतील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून ती केवळ पहिल्या १५० नोंदणीकृत सहभागींसाठीच आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बेंगलोर) येथील विश्वविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अशोक रायचूर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी असतील, तर प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल.
कार्यशाळेमध्ये 'संशोधनासाठी निधी कसा प्राप्त करावयाचा' याविषयी डॉ. रोहित कुमार, 'संशोधन प्रकल्प कसा लिहावा' याविषयी डॉ. विक्रम जयराम, 'विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या संशोधनातील योग्य नितीमत्ता' याविषयी डॉ. टी. ए. अभिनंदन मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय, डॉ. आदित्य सधनाला, एएनआरएफ-पेअर उपक्रमाच्या आयआयएससी-एसयूके स्पोकचे समन्वयक डॉ. सचिन रॉन्डीया हे देखील मार्गदर्शन करतील.

भारतातील नवोन्मेषी संशोधन आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा एएनआरएफ-पेअरच्या हब अँड स्पोक उपक्रमांतर्गत शिवाजी वि‌द्यापीठ देशातील आघाडीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या हबशी स्पोक म्हणून जोडले गेले आहे. देशात अशा एकूण ३२ हब्जची नियुक्ती करण्यात आली असून त्यांपैकी केवळ सातच हब्जना कॅटेगरी-ए म्हणून गणले गेले आहे. या कॅटेगरीतील प्रत्येक हबला १०० कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आलेला आहे. याअंतर्गत शिवाजी वि‌द्यापीठासही सहा कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे, अशी माहिती डॉ. शर्मा यांनी दिली. 

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ. कल्याणराव गरडकर, डॉ. किरण पवार, डॉ. तुकाराम डोंगळे आणि प्रकाश यादव यांच्यासह त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes