शिवाजी विद्यापीठात उद्या ‘अकौंन्टन्सी म्युझियम ऑफ इंडिया’चे उद्घाटन
schedule20 Feb 26 person by visibility 101 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागात उद्या, शनिवारी (दि. २१) सकाळी ९.३० वाजता ‘अकाऊंटन्सी म्युझियम ऑफ इंडिया’चे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी असतील, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंन्टंन्ट ऑफ इंडियाचे पश्चिम विभागीय परिषदेचे चेअरमन सीए केतन सैया, कोल्हापूर शाखेचे चेअरमन सीए नितीन हरगुडे आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.