कागल येथे प्रवीण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी खुली व 15 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा
schedule30 Jul 25 person by visibility 477 categoryक्रीडा

कोल्हापूर : अनुज चेस ॲकॅडमीच्या सहकार्याने कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय खुली व 15 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी मटकरी मंगल कार्यालय, कागल येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते होणार आहे.
स्पर्धा खुली व १५ वर्षांखालील (जन्म तारीख : १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर) अशा २ गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण बक्षिसे ३६ रोख बक्षिसे २५०३० चषक १८ मेडल १८ असे बक्षिसांचे स्वरूप आहे. खुल्या गटामध्ये बक्षिसे प्रथम क्रमांक १०,०४३ रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक ७,०४३ रुपये व ट्रॉफी, तृतीय क्रमांक ३,०४३ रुपये व ट्रॉफी तसेच 15 वर्षाखालील स्पर्धेसाठी बक्षीसे प्रथम क्रमांक १०४३/- रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक ७४३/- रुपये व ट्रॉफी, तृतीय क्रमांक ५४३/- रुपये व ट्रॉफी, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी सांगली, सातारा, बेळगाव, गोवा, पुणे, जयसिंगपूर इचलकरंजी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील नामांकित खेळाडूंना आमंत्रित केले आहे. दि. ०१ ऑगस्ट पर्यंत सहभाग नोंदवावा. वयोगटातील स्पर्धकांनी आधार कार्ड चा फोटो पाठवावा. सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक प्रतीक नाळे (९९७०७६३९९८), रविराज पीस्टे (९५९५९२६८६७ ) कृष्णात पाटील (९४२११०४६५०), बाबुराव पाटील (९४२२७९०४९५), यांनी केले आहे.