SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे मंगळवारी 'कस्तुरबा गांधी : त्यागाची आणि धैर्याची मूर्तीभजन , कीर्तन राज्याच्या संस्कृतीचा कणा : मंत्री आशिष शेलार; " चढता सुरज धीरे धीरे " या कव्वालीने महोत्सवास प्रारंभराजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाची वास्तू समतेचे प्रतिक : मंत्री आशिष शेलारकोल्हापूर जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत बंदी आदेश लागूशक्तीपीठ विरोधात 23 फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला व्हिएतनाममधील परिषदेत‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’ज्ञान, कौशल्य व सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री : संजय बाबरएआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणेम. सु. पाटील यांचा समीक्षाविचार' या विषयावर चर्चासत्र व पुरस्कार

जाहिरात

 

डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे मंगळवारी '

schedule22 Feb 26 person by visibility 7 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे  २४ फेब्रुवारी  रोजी राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन टेक फेस्ट 'टेक्नॉलॉजीया  2026' चे  आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात राज्यासह देशभरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

तंत्रज्ञान, व्यवस्थापन, सर्जनशीलता आणि रणनीती यांचा संगम असलेल्या या टेक फेस्टमध्ये तब्बल ₹१ लाखांची बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धांमध्ये रोबो रेस, कोड शफल, शार्क टँक, डिबेट, रील बॅटल, ॲड मॅड, आयपीएल ऑक्शन, मिनी प्रोजेक्ट, स्क्वेड गेम अशा विविध आकर्षक स्पर्धांचा समावेश आहे. तांत्रिक कौशल्यांसोबतच व्यवस्थापन, सर्जनशीलता आणि रणनीतीची कसोटी या स्पर्धांमधून पाहायला मिळणार आहे.

या सोहळ्यासाठी झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया झंवर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे.

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डेप्युटी रजिस्ट्रार प्रा. अश्विन देसाई, अनिकेत परदेशी आणि दीपक पाटील त्याचबरोबर विद्यार्थी समन्वयक रितेश कोल्हे, आर्या उलपे कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेत आहेत. मर्यादित जागांमुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes