SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणेम. सु. पाटील यांचा समीक्षाविचार' या विषयावर चर्चासत्र व पुरस्कारआंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन: भाषिक अस्मितेचा उत्सवधक्कादायक: चैनीसाठी नातवानेच केला आजीचा 'स्लो पॉयझनिंग'ने खून; कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखे कडून छडामहाविस्तार AI अँपद्वारे शेतीत डिजिटल क्रांती; जिल्ह्यात ७५ हजारांहून अधिक नोंदणीदुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 25 फेब्रुवारी पासून सुरुलोकप्रतिनिधीच्या सूचना विचारात घेऊन वार्षिक मुल्यदर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा : जिल्हाधिकारी अमोल येडगेशिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती‘गोकुळ’ परिवारातील सदस्यांची जि.प. निवड अभिमानास्पद : नविद मुश्रीफ; गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कारकोल्हापुरात 'कव्वाली महोत्सवा'चे २१ फेब्रुवारीपासून आयोजन

जाहिरात

 

म. सु. पाटील यांचा समीक्षाविचार' या विषयावर चर्चासत्र व पुरस्कार

schedule21 Feb 26 person by visibility 114 categoryराज्य

कोल्हापूर  : डॉ. म. सु. पाटील हे १९८० नंतरच्या मराठी समीक्षकांमधील अग्रगण्य समीक्षक होत. मर्मग्राही समीक्षेचा वस्तुपाठ देणारे व्यासंगी काव्यसमीक्षक आणि वैचारिक लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. मराठी समीक्षालेखन परंपरेत त्यांची समीक्षा ही मूलभूत स्वरूपाची आहे. 'आदिबंधात्मक समीक्षा' व 'तृष्णेचे काव्यशास्त्र' या संकल्पना मांडण्याचे श्रेय डॉ. म. सु. पाटील यांना जाते. संत आणि दलित साहित्माचा व्यासंग असणाऱ्या डॉ. पाटील यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या काव्याचे आणि दलित कवितेचे सौंदर्य उलगडून दाखवले.

त्यांची एकूण मराठी समीक्षेतील कामगिरी मोलाची आहे. त्यांच्या या कामगिरीचा आणि त्यांनी मांडलेल्या तृष्णाबंध व आदिबंधात्मक काव्यसमीक्षेचा विचार मध्यवर्ती ठेवून मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ व नव-अनुष्टुभ परिवार, प्रतिष्ठान, येवला (नाशिक) यांच्यावतीने दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी 'डॉ. म. सु. पाटील यांचा समीक्षाविचार' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्राचे बीजभाषण प्राचार्य डॉ. दिलीप धोंगडे करणार आहेत. यामध्ये गणेश कनाटे, आशुतोष पाटील, नंदकुमार मोरे, वीरधवल परब म. सु. पाटील यांचा समीक्षाविचार केंद्रस्थानी ठेवून मांडणी करणार आहेत. सत्र-अध्यक्ष डॉ. एकनाथ पगार, डॉ. प्रतिभा कणेकर असणार आहेत. दुपारी ४ वाजता ज्येष्ठ समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना, 'डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार' ज्येष्ठ लेखक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. पाटील यांच्या कन्मा-मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका नीरजा प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आहेत. यामध्ये विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, नव-अनुष्टुभ परिवारातील लेखक, मराठीतील नामवंत अभ्यासक व समीक्षक सहभागी होणार आहेत. हे चर्चासत्र शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र सभागृह येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत होणार आहे. या चर्चासत्रासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) रणधीर शिंदे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes