प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
schedule24 Jan 26 person by visibility 43 categoryराज्य
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त सहा महसूली विभागात गीत, नृत्य, नाट्य यांच्या सादरीकरणातून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वंदे मातरम् या देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी, रात्रौ ८:१५वा. रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वंदे मातरम्’ हा देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कार चा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात गायक राहुल गंगाधर जेठे, गायिका प्रिया सतिश पवार आणि भाग्यश्री अभ्यंकर व समुह, तसेच नृत्याविष्कार: फ्युजन इंस्टिट्यूट ऑफ डांस समुह, यांचा सहभाग असून प्रवेश विनामूल्य आहे तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि आस्वाद घ्यावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.