SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीमध्ये पीबीएल दिन उत्साहात गोकुळ'च्या अध्यक्षाची आज हायव्होल्टेज निवडणूक; शासननियुक्त संचालकांमुळे राजकीय संघर्ष टोकालाशांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन: विज्ञान, शांतता आणि मानवी प्रगतीचा संगमएकमेकांच्या हातात हात घालून दुष्काळावर मात करूया : पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटीलऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळीगोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा?अध्यादेशाच्या विरोधात कोल्हापुरात पेटला सहकाराचा असंतोष; 'गोकुळ'वरील सरकारचा डाका खपवून घेणार नाही!सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामातील साखर पोत्याचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजन‘गोकुळ’वर शासननियुक्त सदस्यांचा घाला; सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात विराट ‘संघर्ष मोर्चा’!राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन: न्याय सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीमध्ये पीबीएल दिन उत्साहात

schedule10 Nov 26 person by visibility 83 categoryशैक्षणिक

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये एस.वाय. व टी.वाय. बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पाधारित शिक्षण (पीबीएल) दिनाचा सोहळा मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, कोल्हापूरचे माजी वरिष्ठ महाव्यवस्थापक नितीन भावे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन  वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांच्या हस्ते झाले. यावेळी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे,  पीबीएल समन्वयक प्रा. एस. व्ही. निकम तसेच सुधीर पाटील, शिवकुमार सासणे व सर्व विभागीय समन्वयक उपस्थित होते.

या उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील व कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रकल्प प्रदर्शनात सर्व अभियांत्रिकी शाखांतील सुमारे २३०० विद्यार्थ्यांनी ३५० हून अधिक प्रकल्प गटांद्वारे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. यावेळी वारणा पीबीएल पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांचा नितीन भावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पांचे उत्पादन विकास, उद्योजकता व स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्याबाबत मार्गदर्शन केले. श्री वारणा रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमासाठी सहकार्य उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी विद्यार्थ्यांनी उद्योगजगताच्या गरजांनुसार कौशल्ये विकसित करून संशोधन व नवोपक्रमाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व विभागाचे समन्वयक प्रा. एम. व्ही.जाधव,  प्रा. आर. आर  चव्हाण, प्रा.एन. एम. शिंदे, प्रा. ए ए पारेख, प्रा.ओ आर. जंगम, प्रा. एस के जंत्रे,  प्रा.एन. सी. देसाई,  प्रा.आर. ए. पाटील,  प्रा. एल बी आडूरकर यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes