कोल्हापूर महानगरपालिकेच्या भाडेतत्त्वावरील डांबरी प्लॅंटद्वारे विभागीय कार्यालय क्रं.2 अंतर्गत पॅचवर्कची कामे सुरु
schedule04 Dec 25 person by visibility 48 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती तसेच नवीन रस्त्यांची निर्मिती युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिकेने रस्ते दुरुस्तीच्या कामाचा वेग व गुणवत्ता वाढवण्यासाठी भाडेतत्त्वावर डांबरी प्लॅंट घेतला आहे. या प्लॅंटसाठी लागणारी आवश्यक खडी, डांबर तसेच तांत्रिक युनिटचे साधनसामग्री महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्यात आली आहे.
विभागीय कार्यालय क्रं.2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत आज लक्ष्मीपूरी फोर्ड कॉर्नर, महाराणा प्रताप चौक ते व्हिनस कॉर्नर या मुख्य रस्त्यावर पॅचवर्क करण्यात आले. तर विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी अंतर्गत उद्योग भवन समोरील रस्त्याचे डस्टींगचे काम सुरु आहे. यानंतर विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी व विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान अंतर्गत रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे हाती घेण्यात येणार आहेत. थेट हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कंपनीकडून डांबर खरेदी केल्यामुळे डांबराची गुणवत्ता व त्याचा वापर योग्य तऱ्हेने केल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता सुधारणार आहे.
ही सर्व कामे प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपशहर अभियंते सुरेश पाटील व अरुण गुजर यांच्या देखरेखी खाली करण्यात येत आहेत.