कोल्हापूर : शिंगणापूर अशुध्द जल उपसा केंद्राकडील एक पंप नादुरूस्त झालेने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या भागास पंप दुरूस्त होईपर्यत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून ई वॉर्ड व सलग्नीत उपनगरांना होणारा पाणी पुरवठा शनिवार, दि.14 जानेवारी 2023 पासून एक दिवस आड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ए , बी वॉर्ड व सलग्नीत उपनगरांना रविवार दि.15 जानेवारी 2023 रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. याप्रमाणे पंप दुरूस्त होऊन कार्यान्वित होईपर्यंत एक दिवस आड दि.30 जानेवारी 2023 पर्यंत पाणी पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये ई वॉर्डास व संपूर्ण राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंशन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीनपार्क, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारपेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत इत्यादी भागात शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी पासून एक दिवस आड पाणी पुरवठयाचे नियोजन जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित होईपर्यंत करण्यात आले आहे.
त्याचबरोबर ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरे भाग व शहराअंतर्गत येणा-या संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, चंद्रेश्वरगल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपींगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, वाय पी पोवार नगर, मिरजकर तिकटी इत्यादी भागामध्ये शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी पासून एक दिवस आड पाणी पुरवठयाचे नियोजन जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित होईपर्यंत करण्यात आले आहे. तरी शहरातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.