SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

गोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीका

schedule05 May 26 person by visibility 449 categoryउद्योग

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ' च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोकुळची मुदत संपल्यानंतर लोकशाही मार्गाने निवडणूक होणे आवश्यक असताना, प्रशासक नेमून ही प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न सुरू होते आणि आता प्रशासकाची नियुक्ती करून सहकार क्षेत्रातील लोकशाहीला हरताळ फासला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार सतेज पाटील यांनी पुढे सांगितले की, प्रशासनाने ७० ते ७५ दिवसांच्या आत ऑडिट आणि इतर तांत्रिक सुनावणी पूर्ण करून निवडणूक घेण्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे या मुदतीतच सर्व प्रक्रिया पूर्ण करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी निवडणूक पार पाडावी, अशी आमची ठाम मागणी आहे. 
कोविड काळातील नियमांचा आधार घेऊन प्रशासक नेमणे हे दूध उत्पादक सभासदांच्या हिताचे नसून, प्रशासनाने तातडीने ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes