प्रतापसिंह जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात दिमाखात नागरी सत्कार
schedule06 Nov 25 person by visibility 107 categoryराज्य
कोल्हापूर : पद्मश्री ग. गो. जाधव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिले. त्यांचा हाच वारसा प्रतापसिंह जाधव यांनी पुढे नेला आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.
'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील पोलिस परेड मैदानावर आयोजित सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून शरद पवार बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन डॉ. जाधव यांचा गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. जाधव यांनी सीमा प्रश्न, टोल, ऊस आंदोलन, सर्किट बेंच अन् मराठा आंदोलनांपर्यंत सगळ्या लढ्यात केवळ प्रश्न न मांडता ते सोडवण्याची, त्यातून मार्ग काढण्याची भूमिका घेतली. एकनाथ शिंदे आणि अजित पवारयांनीही आपल्या भाषणातून गौरव केला. यावेळी डॉ. जाधव यांन लिहिलेल्या 'सिंहायन' या आत्मचरित्रा प्रकाशन करण्यात आले. खासदार शाहॣ छत्रपती यांनी प्रास्ताविक, तर डॉ. योगे जाधव यांनी स्वागत केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आभार मानले
या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि नामदार हसन मुश्रीफ , मंत्री नामदार उदय सामंत, नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार पंकजा मुंडे, नामदार अशिष शेलार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला आमदार जयंत पाटील , आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, संजय मंडलिक, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि अन्य मान्यवरांसह उपस्थित राहून डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच डॉ. जाधव यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यशाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.