जिल्ह्यात शिदेसेनेला चांगले यश मिळेल : एकनाथ शिंदे; शिंदेसेनेच्या गटप्रमुखांचा कोल्हापुरात मेळावा
schedule06 Nov 25 person by visibility 100 categoryराजकीय
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरून विरोधकांनी यश मिळवले; पण विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदारांनी चांगला धडा शिकवला. येणाऱ्या निवडणुकीतही जिल्ह्यात शिदेसेनेला चांगले यश मिळेल, असा विश्वासही शिंदेसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला
शिंदेसेनेच्य गट प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, गृहराज्य मंत्री (शहरे) योगेश कदम प्रमुख उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व दहाच्या दहा जागा महायुतीने जिंकल्या, विरोधकांचे सर्व मनसूबे मतदारांनी उधळले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व्होटचोरीचा आरोप करीत आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाही पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शहर, जिल्ह्यात शिंदेसेनेच्या संघटनेची बांधणी मजबूत झाली आहे. म्हणूनच दुसऱ्या पक्षातून आमच्याकडे प्रवेश होत आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शिंदेसेनेसाठी महापालिका निवडणूक महत्वाची आहे. आमच्याकडे येण्यासाठी कार्यकत्यांची झुंबड उड़ाली आहे. खासदार धैर्यशील माने यांचे भाषण झाले.
या मेळाव्यास उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश अबिटकर, राज्यमंत्री योगेश कदम, मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव , खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, सुजित मिणचेकर, कोल्हापूर शहर व जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ प्रमुख शारंगधर देशमुख, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, विजय बलगुडे, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर सरिता मोरे, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, रमेश पोवार, परिवहन समितीचे माजी सभापती अजित मोरे, मृदुला पुरेकर, माजी नगरसेवक रामचंद्र भाले, रत्नेश शिरोळकर, राजू हुंबे, स्मिता माळी, वैभव माळी, अजय इंगवले, विकी महाडिक, रणधीर महाडिक, नेपोलिनय सोनुले, दुर्गेश लिंग्रस, योगेश शिंदे, विराज ओतारी, अनिरुद्ध सांगावकर, अभिजीत ओतारी, ऋषिकेश ओतारी, गणेश भोसले, इंद्रजीत घुणकीकर, विनायक कोरडे, पूनम फडतारे, अंजली जाधव, अर्जुन आंबी, शुभांगी भोसले आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.