SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यतामाजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

schedule16 Apr 26 person by visibility 249 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल कोल्हापूर  मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

  यावेळी प्राचार्या /मुख्याध्यापिका  सविता पाटील व उपप्राचार्य  साबळे सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते क्रीडा शिक्षक  महेश सूर्यवंशी  म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील विविध जाती-धर्मांना एकत्रित ठेवण्याचे कार्य केले. सामाजिक न्याय, दलित हक्क तसेच भारतीय संविधान निर्मितीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सौ सविता पाटील यांनी कायदेतज्ञ, घटनातज्ञ, कृषितज्ज्ञ, जलतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ असणाऱ्या महामानवाला आजच्या पिढीने डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यामध्ये घेण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व्ही. एम मंडलिक  यांनी केले, तर सौ एस एस गोणी यांनी आभार मानले.

   या कार्यक्रमास पर्यवेक्षक  भोई  व कॉलेज व शाळेमधील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes