डी.के.टी.ई. च्या प्रा. योगिता सावंत यांना पी.एच.डी. प्रदान
schedule14 Aug 25 person by visibility 169 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये इटीसी विभागात कार्यरत असणारे प्रा. वाय.व्ही. सावंत यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त झाली आहे.
प्रा.योगिता सावंत हया गेली १५ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘कम्पुटर व्हिजन ऍपरोच फॉर इस्टीमेशन ऍण्ड प्रिडीक्शन ऑफ परफॉमन्स पॅरॅमिटरर्स ऑफ निडल पंचड नॉनओव्हन फॅब्रिक एअर फिल्टर’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी डीकेटीईच्या डायरेक्टर प्रा. डॉ एल.एस. अडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले.
पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. अडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ. एस.ए.पाटील उपस्थित होते.